भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पाचवी कसोटी सिडनी येथे खेळली जाणार आहे. दोन्ही संघ 3 जानेवारीपासून आमनेसामने येतील. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्या आल्या आहेत. सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार का? या प्रश्नाचं उत्तर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलं. शास्त्री म्हणाले की, रोहित शर्मा निवृत्त झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही, कारण तो आता तरुण राहिलेला नाही.
रवी शास्त्री म्हणाले की, “संघात अनेक युवा खेळाडू आहेत. शुबमन गिल आहे, ज्याच्याकडे 40 च्या सरासरीनं फलंदाजी करण्याची कला आहे आणि तो खेळत नाहीये.” शास्त्री म्हणाले की, “शुबमन गिलसारखा खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही हे आश्चर्याचं आहे. सिडनी कसोटीच्या दिवसाच्या शेवटी जर भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी पात्र ठरला, तर ती पूर्णपणे वेगळी बाब आहे. अन्यथा, रोहित शर्माच्या निवृत्तीची वेळ आली आहे, असं मला वाटतं. जर मी रोहित शर्माच्या जवळ असतो, तर मी त्याला म्हटलं असतं, जा आणि धमाका कर.”
रोहित शर्मा सिडनी कसोटीचा भाग नसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. भारतीय संघ पाचव्या कसोटीत रोहित शर्माशिवाय मैदानात उतरू शकतो. मात्र, भारतीय संघ व्यवस्थापन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने पिछाडीवर आहे. टीम इंडियाला सिडनी कसोटी जिंकून मालिका 2-2 अशी बरोबरीत राखायची आहे.
भारतीय संघानं पहिली कसोटी जिंकून मालिकेची शानदार सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला. उभय संघांमधील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. मात्र त्यानंतर चौथ्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.
हेही वाचा –
“रोहितने अशाप्रकारे सोडून जाऊ नये”, माजी क्रिकेटपटूचा हिटमॅनला पूर्ण पाठिंबा
मोठी बातमी! रोहित शर्माची सिडनी कसोटीतून माघार, हा खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व
IND vs AUS: सिडनी कसोटीत टीम इंडियाची प्लेइंग 11 बदलणार? या खेळाडूचे होणार कमबॅक