भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी सोशल मीडियावर ट्रेंडला आहे. कारण ठरले, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा झालेला दारून पराभव. ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारताला तब्बल 209 धावांनी पारभूत केले. अशात चाहते भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या एमएस धोनीची आठवण काढत आहेत. रवी शास्त्री यांनी धोनीविषयी केलेले एक विधान देखील चर्चेत आहे.
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) मागच्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. डब्ल्यूसीटी अंतिम सामन्यात देखील शास्त्री समालोचन करताना दिसले. रविवारी (11 जून) भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि जाणकाऱ्यांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आल्याचे दिसले. पण या सर्वांमध्ये एक प्रतिक्रिया सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली, ती म्हणजे रवी शास्त्रींची.
रवी शास्त्रींच्या मते कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकणे सोपी गोष्ट नाहीये. एमएस धोनी (MS Dhoni ) भारतासाठी तीन आयसीसी ट्रॉफी जिंकला असल्यामुळे चाहत्यांना ही बाब सोपी वाटत असू सकते. शास्त्री समालोचन करताना म्हणाले, “आयसीसी ट्रॉफी जिंकणे सोपे नसते, एमएस धोनीमुळे ते सोपे वाटते.” दरम्यान, शास्त्रींच्या या वक्तव्याशी बहुतांश चाहते आणि जाणकार सहमनत असल्याचे दिसते. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 टी-20 विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यूपूर्वी भारताने 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वात वनडे विश्वचषक जिंकला होता.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याविषयी
दरम्यान बुधवारी (7 जून) सुरू झालेल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासमोर विजयासाठी शेवटच्या डावात 444 धावांचे लक्ष्य ठेवले गेले होते. पण संघ शेवटच्या डावात 234 धावांपर्यंतच मजल मारू शकला. परिणामी ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवला. तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 469 धावा केल्या होत्या. भारताचा पहिला डाव 296 धावांवर गुंडाळला गेला होता. ट्रेविस हेड याने पहिल्या डावात 163 धावांची खेळी केलेली, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले. (Ravi Shastri praises MS Dhoni who won three ICC trophies for India)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन! WTC Final गमावल्यानंतर द्रविडकडून पराभवापेक्षा विरोधकांच्या विजयाला महत्व
IND vs AUS : कोच द्रविडने ‘या’ खेळाडूंवर काढला राग, सामना हारण्यामागील मोठ्या कारणाचाही केला खुलासा