आज बीसीसीआयच्या सल्लागार समीतीने वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा नियुक्ती केली आहे. मुंबईत घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या सल्लागार समीतीमध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचा समावेश आहे. हे तिघेही या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.
आज मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्रींची निवड करण्याआधी सल्लागार समीतीने प्रशिक्षकपदासाठी अंतिम 6 जणांची निवड करण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतींनंतर लगेचच शास्त्रींची मुख्य प्रशिक्षक म्हणून पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली.
या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने शास्त्रींसह माईक हेसन, टॉम मूडी, फिल सिमन्स, लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग यांची अंतिम उमेदवार म्हणून निवड केली होती. पण मुलाखतीआधी सिमन्स यांनी माघार घेतली. त्यामुळे अन्य पाच जणांच्याच मुलाखती घेण्यात आल्या.
त्यातील शास्त्री, हेसन आणि मूडी यांची पहिल्या तीनमध्ये निवड झाली. पण अखेर या सर्वांमध्ये शास्त्रींनी बाजी मारली.
The CAC reappoints Mr Ravi Shastri as the Head Coach of the Indian Cricket Team. pic.twitter.com/vLqgkyj7I2
— BCCI (@BCCI) August 16, 2019
शास्त्री हे 2017 पासून भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत भारतीय संघाने 21 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला आहेत. तसेच वनडेत 60 पैकी 43 सामन्यात तर टी20मधील 36 पैकी 25 सामन्यात भारताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मिळवला आहे.
तसेच 2019 च्या विश्वचषकात भारताने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. त्याचबरोबर मागीलवर्षी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका विजयही भारतीय संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मिळवला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–बोल्टच्या हेल्मेटमध्ये अडकला चेंडू आणि मग जे घडले ते पाहून कुणालाही हसू लपवता आले नाही!
–या कारणामुळे माजी क्रिकेटपटू व्हीबी चंद्रशेखर यांचे झाले निधन, पोलिसांनी केला मोठा खूलासा






