इंडियन प्रीमियर लीग या जगप्रसिद्ध टी२० लीगने क्रिकेटपटूंना एक मंच उपलब्ध करून दिला आहे, जिथे क्रिकेटपटू त्यांच्यातील प्रतिभा दाखवून आंतरराष्ट्रीय संघात जागा मिळवू शकतात. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वाटते की, पंजाब किंग्जचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा आयपीएलमध्ये गेल्या ३ हंगामापासून सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे. ज्यामुळे लवकरच त्याला राष्ट्रीय टी२० संघात जागा मिळू शकते.
अर्शदीपने (Arshdeep Singh) २०१९ साली आयपीएलमध्ये (IPL) पदार्पण केले होते आणि गेल्या ४ हंगामापासून पंजाब संघाचा (Punjab Kings) महत्त्वाचा भाग बनला आहे. पंजाबने आयपीएल २०२२च्या (IPL 2022) मेगा लिलावापूर्वी ज्या खेळाडूंना रिटेन केले होते, त्यामध्ये अर्शदीपचेही नाव होते. या २३ वर्षीय गोलंदाजाने नव्या चेंडूसोबत आपल्या प्रदर्शनात बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. तसेच तो डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजीही करत आहे.
अर्शदीपबद्दल बोलताना शास्त्री (Ravi Shastri) स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले की, “कोणता खेळाडू जो इतका युवा आहे आणि दबावाच्या परिस्थितीत सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे, हे पाहणे शानदार आहे. तो दबावाच्या परिस्थितीतही शांत राहतो आणि डेथ ओव्हर्समध्ये चांगले प्रदर्शन करतोय. यावरून समजते की, तो खूप वेगाने पुढे जात आहे. तो लवकरच भारतीय संघातही सहभागी होऊ शकतो.”
अर्शदीपबरोबरच आयपीएलमध्ये ज्या इतर खेळाडूंनी क्रिकेट दिग्गजांना प्रभावित केले आहे, त्यामध्ये सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचेही नाव येते. तसेच मुंबई इंडियन्सचा तिलक वर्माचाही यात समावेश आहे. ब्रायन लाराने मलिकची तुलना वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज फिदेल ऐडवर्ड्ससोबत केली आहे.
लाराने (Brain Lara) म्हटले की, “उमरान मलिक (Umran Malik) मला फिदेल एडवर्ड्सची आठवण करून देतो. जेव्हा त्याने सुरुवात केली होती, तेव्हा तो खूप वेगाने गोलंदाजी करायचा. मला वाटते की, मलिकला माहिती आहे की तो याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जागा बनवू शकतो. मलाही वाटते की, तो नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल. आयपीएलमध्ये फलंदाजांना वेगवान गोलंदाजी खेळण्याची सवय होते. त्यामुळे तो त्याच्या प्रदर्शनात नक्कीच प्रगती करेल. त्याला नव्या गोष्टी शिकायच्या आहेत, जे चांगले आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
माही आजही मास्टर! माजी दिग्गजाने केले मान्य, धोनीपेक्षा सरस कोणीही नाही; वाचा मन जिंकणारे वक्तव्य
…आयपीएलमधून माघार घे! खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराटबद्दल माजी दिग्गजाचे लक्षवेधी भाष्य
‘सीएसके त्याचे कुटुंब आहे, बंदी उठल्यानंतर आनंदात होता माही’, इंग्लंडच्या दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया