सध्या भारतीय क्रिकेट हे जगातील सर्वात समृद्ध क्रिकेट मानले जाते. कारण, सर्वाधिक युवा आणि गुणवान क्रिकेटपटू भारत हा दरवेळी समोर आणत असतो. आयपीएलच्या माध्यमातून असे अनेक युवा खेळाडू आपले कौशल्य दाखवत असतात. हाच धागा पकडून भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
शास्त्री हे आपले परखड मत व्यक्त करण्यासाठी ओळखले जातात. नुकतेच एका मुलाखतीत बोलताना त्यांनी आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटचा मोठा फायदा झाल्याचे म्हटले. ते म्हणाले,
“भारतीय क्रिकेट आजच्या ठिकाणी आहे त्याचे श्रेय आयपीएलला जाते. आपल्याला आयपीएलला यासाठी धन्यवाद द्यावे लागतील. आज आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय कसोटी संघात नियमित जागा बनवणारे खेळाडू देखील आहेत. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. त्यामुळे त्यावर शंका उपस्थित करणे योग्य नाही.”
आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक अशा खेळाडूंची निवड झाली आहे ज्यांनी आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याचवेळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना डावल्यामुळे निवड समितीवर जोरदार टीका होतेय. याच कारणाने शास्त्री यांनी हे वक्तव्य केले.
शास्त्री यांचे हे वक्तव्य अनेकदा योग्य ठरते. पहिल्या आयपीएलमधून नावारूपाला आलेले युसुफ पठाण व रवींद्र जडेजा हे खेळाडू कालांतराने भारतीय संघाचा प्रमुख भाग बनलेले. त्यानंतर आता भारतीय संघाचे नेतृत्व देखील केलेल्या जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या या खेळाडूंची पहिली ओळख आयपीएलमधून झालेली. वेस्ट इंडीज दौऱ्यावर देखील यशस्वी जयस्वाल व ऋतुराज गायकवाड या आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंची निवड झाली आहे.
(Ravi Shastri Said IPL Is Reason Behind Indian Cricket Success)
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा एकाच वेळी खेळणार दोन टीम इंडिया! एक भारतात तर दुसरी चीनमध्ये
“हार्दिकला लगेच वनडे संघाचा कर्णधार करा”, शास्त्रींनी केली बीसीसीआयकडे मागणी