भारतीय संघाचा बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौरा तीन दिवसांवर येऊन ठेपलाय. या दौऱ्यात ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि त्यानंतर ४ कसोटी मालिका खेळण्यात येणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून वनडे सामन्याने होणार आहे. यानंतर टी२० मालिकेत दोन्हीही संघ एकमेकांचा सामना करतील. पुढे १७ डिसेंबरपासून ऍडलेट येथे दिवस- रात्र सामन्याने कसोटी मालिकेची सुरुवात होईल. या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. त्यावर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटचे समर्थन करत मोठे विधान केले आहे.
त्यांचे असे म्हणणे आहे की, असे प्रसंग आयुष्यात वारंवार येत नसतात. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना शास्त्री म्हणाले, विराट त्या खेळाडूंपैकी एक नाही, जो आपल्या देशासाठी आवश्यक कारण नसताना कोणताही सामना सोडेल.
एकमेव आशियाई कर्णधार
शास्त्रींना विश्वास आहे की, विराट शेवटच्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला परत येईल. परंतु ऑस्ट्रेलियाच्या प्रोटोकॉलनुसार त्याला १४ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. क्वारंटाईनमुळे त्याला शेवटचा कसोटी सामनाही सोडावा लागत आहे. शास्त्रींनी म्हटले की, १४ दिवसांसाठी क्वारंटाईन राहणे नक्कीच सोप्पं काम नाही.
पुढे बोलताना शास्त्रींनी तीन सामने सोडणाऱ्या विराटवर टीका करणाऱ्यांनाही जोरदार सुनावले. यावर बोलताना ते म्हणाले, ‘विराट हा एकमेव आशियाई कर्णधार आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाला आपल्या आणि त्यांच्या देशात कसोटीत मात दिली आहे.’
असे होतील सामने-
भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेची सुरुवात वनडे मालिकेने होईल. यातील पहिला वनडे सामने २७ नोव्हेंबरला खेळला जाईल. दुसरा वनडे सामना २९ नोव्हेंबर, तर तिसरा वनडे सामने २ डिसेंबरला खेळला जाईल.
वनडे मालिकेनंतर लगेच एका दिवसाच्या अंतराने ४ डिसेंबरपासून टी२० मालिकेची सुरुवात होईल. यातील दुसरा टी२० सामने ६ डिसेंबर आणि तिसरा टी२० सामना ८ डिसेंबरला खेळवला जाईल.
यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका म्हणजेच बॉर्डर- गावसकर ट्रॉफीची सुरुवात १७ डिसेंबरपासून होणार आहे. हा दिवस- रात्र कसोटी सामना असणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून, तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून आणि चौथा कसोटी सामना १५ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“विराट शिवाय टीम इंडिया म्हणजे स्मिथ, वॉर्नर शिवाय ऑस्ट्रेलिया”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यांतील टीम इंडियाचे सर्वात मोठे ३ विजय
पुकोवस्की की बर्न्स कोणासोबत करणार ओपनिंग? वॉर्नरने दिले ‘हे’ उत्तर