---Advertisement---

‘संघात हार्दिक नसला तर…’ शास्त्री गुरूजींनी टीम इंडियाला दिलाय इशारा

On: बुधवार, ऑगस्ट 24, 2022 11:42 AM
Hardik-Pandya-and-Rohit-Sharma
---Advertisement---

हार्दिक पांड्या आणखी एका मोठ्या परीक्षेसाठी सज्ज झाला आहे. खराब तंदुरुस्तीमुळे गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात त्याची कामगिरी खराब झाली होती. यानंतर तो चाहत्यांपासून दिग्गजांपर्यंत सर्वांच्या निशाण्यावर होता. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून बराच ब्रेक घेतला. आयपीएल २०२२ मधून तो पुन्हा मैदानात परतला. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स हा नवा संघ चॅम्पियन बनला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली. आता टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंड्याला आशिया चषकासाठी संघातील सर्वात मोठा खेळाडू म्हटले आहे. २७ ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होत आहे. २८ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “हार्दिक पांड्याची भूमिका खूप महत्त्वाची असेल, कारण तो संघाला संतुलन देतो. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात तो गोलंदाजी करू शकला नाही, त्यामुळे आम्ही स्पर्धा गमावली. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक यांसारख्या खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांना वर्ल्ड कपपूर्वी दुखापतींपासून सुरक्षित ठेवता येईल.”

सूर्यकुमार अतिशय धोकादायक आहे
सूर्यकुमार यादवचे भारतातील सर्वात धोकादायक खेळाडू असल्याचे वर्णन करताना पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम म्हणाला की, “भारताकडे रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहलीसारखे अनेक दिग्गज आहेत, परंतु माझ्या दृष्टीने सध्या सर्वात धोकादायक सूर्यकुमार यादव आहे, ज्यांच्याकडे ३६० डिग्री आहेत. शॉट्स लयीत असताना, कोणताही गोलंदाजी हल्ला उडवून लावता येतो. जेव्हा पाकिस्तानचा विचार केला जातो तेव्हा बाबर आणि मोहम्मद रिझवान हे महत्त्वाचे असतील, जे तांत्रिकदृष्ट्या पुरेसे मजबूत आहेत आणि त्यांना जास्त संधी देऊ शकत नाहीत. त्यांच्या बॅटवर नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक असेल.”

सर्वात कठीण आशिया कप
शास्त्रींनी सांगितले की, “इतर सहभागी संघांची कामगिरी पाहता कोणताही अंदाज बांधणे कठीण आहे आणि हा आशिया चषक आतापर्यंतचा सर्वात कठीण असेल. संघांच्या कामगिरीतील फरक इतका कमी आहे की कोणताही संघ कोणालाही पराभूत करू शकतो. भारत आणि पाकिस्तान प्रबळ दावेदार असतील, परंतु उर्वरित संघांनाही कमी लेखता येणार नाही.”

अक्रम म्हणाला की, “आमच्या काळात फक्त भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेबद्दलच बोलले जायचे, पण अफगाणिस्तानही खूप धोकादायक संघ आहे. त्याच्याकडे राशिद खानसारखे मॅच विनर आणि अनेक निडर फलंदाज आहेत. श्रीलंका नेहमीच धोकादायक संघ राहिला आहे, तर बांगलादेश चढ-उतार करण्यात पटाईत आहे.”

दरम्यान, आशिया चषक सुरू होण्यापूर्वी अनेक दिग्गजांनी त्यांचे अंदाज बांधायला सुरू केले आहेत. अशात पाकिस्तानी संघ युएऊयेथे दाखल झाला आहे. शिवाय टीम इंडियाही येत्या २ दिवसांत युएऊमध्ये सरावाला सुरुवात करेल. आशिया चषकाच्या वेळापत्रकानुसार स्पर्धा २७ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. मात्र, संपूर्ण जगाचे लक्ष सध्या २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर लागले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषक २०२२ बाबत मोठी बातमी समोर! स्पर्धेचे यजमानपद बांग्लादेशच्या पदरात
VIDEO: हार्दिकच्या अंगात संचारला बुमराह! पंड्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर ‘बुम-बुम’चा खास रिप्लाय

VIDEO: ‘शुबमनच्या शतकामागे युवराज सिंगचा हात!’ स्वत: गिलने सांगितले गुपित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---