---Advertisement---

द्रविड घेणार का भारताचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांची जागा? स्वत: ‘द वॉल’ने दिले उत्तर

---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळली गेली. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-१ ने विजय मिळवला होता. तर टी-२० मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून राहुल द्रविड यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत स्वतः राहुल द्रविड यांना काय वाटते? चला जाणून घेऊया.

राहुल द्रविड यांना श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद देण्यात आले होते. तर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर संपणार आहे. त्यामुळे राहुल द्रविड यांना रवी शास्त्री यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. परंतु राहुल द्रविड भविष्यातील गोष्टींचा काहीच विचार नाहीत, असे त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले

राहुल द्रविड यांनी स्पोर्टकिडाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “मी या अनुभवाचा भरपूर आनंद घेतला आहे. खरं सांगायचं तर मी भविष्यात येणाऱ्या गोष्टींचा विचार केला नाही. मी जे करत आहे, त्यामध्ये मी सहमत आहे. मी हा दौरा पूर्ण करण्याचा आणि या अनुभवाचा आनंद घेण्याव्यतिरिक्त इतर कुठलाही विचार केला नाही.”

तसेच राहुल द्रविड पुढे म्हणाले की, “मला या लोकांसोबत काम करायला खूप आवडते. सर्वांनाच माहित आहे की, एक पूर्ण वेळ प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणे मोठे आव्हान असते. म्हणून मला खरोखर माहित नाही.”

द्रविड यांनी पार पाडल्या आहेत या भूमिका
पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता. त्यावेळी राहुल द्रविड हे संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. तसेच इशान किशन, रिषभ पंत, शुबमन गिल आणि संजू सॅमसन यांसारख्या खेळाडूंना घडवण्यामागे राहुल द्रविड यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच आता ते राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

बिग ब्रेकिंग! पराभवानंतर धवनसेनेला आणखी मोठा धक्का; चहलसह ‘हा’ खेळाडू पॉझिटिव्ह

निर्णायक सामन्यात संजू सॅमसन भोपळाही न फोडता बाद, नेटकऱ्यांनी केले भरपूर ट्रोल

टी२० मालिका विजयानंतर वैरत्व विसरुन शनाकाने दाखवला मनाचा मोठेपणा, द्रविड अन् धवनचे मानले आभार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---