नुकत्याच काही महिन्यांपूर्वीचा भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नक्कीच स्मरणात असेल. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत आणि प्रतिकूल परिस्थितीत भारतीय संघाने कमालीचे लाजवाब प्रदर्शन केले. आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात चीतपट करत कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवला.
मात्र या दौऱ्यात अनेक चांगल्या आठवणींसोबत एक कटू आठवणही भारतीय संघासोबत जोडली गेली. अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाला होता. ही भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. त्यामुळे ३६ हा आकडा भारतीय संघासाठी आता ती वाईट आठवण ठरला आहे.
मात्र याच संदर्भात आता रवी शास्त्रींनी एक ट्विट केले आहे. ज्यात यांनी या ३६च्या आकड्याकडे बघण्याचा एक नावच पैलू उलगडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी शास्त्रींनी हे ट्विट केले आहे. यात त्यांनी ३६च्या आकड्याशी जुळलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.
या ट्विटमध्ये शास्त्री म्हणाले, “हा…खूप सारे ३६ आहेत. माझे ६ षटकार आहेत. संघाने अॅडलेड येथे ३६ केले. वनडे नंबर ३६ आहे. गावसकर यांचे ३६ आहेत. युवराज सिंगचे ६ षटकार आहेत. अजून पण खूप सारे होऊ शकतात.” थोडक्यात शास्त्री यांनी ३६ हा आकडा भारतीय संघासाठी विविध घटनांमध्ये खास ठरला असल्याचे स्पष्ट केले आहे.
Ha… Too many 36's. Six 6s mine. Team 36 Adelaide. One day number 36. Gavaskar 36. @YUVSTRONG12 six 6s. Could be more…🇮🇳🙌🏻 pic.twitter.com/WUG9BxCzzT
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) March 10, 2021
रवी शास्त्री यांनी यात उल्लेख केलेले ६ षटकार त्यांनी १९८४-८५ साली रणजी ट्रॉफीच्या एका सामन्यात बडोदा संघाविरुद्ध खेळतांना मारले होते. तिलकराज नावाच्या गोलंदाजाला त्यांनी एकाच षटकात हे ६ षटकार मारले होते. शास्त्रींनी उल्लेख केलेली गावसकर यांची ३६ धावांची खेळी १९७५ सालच्या विश्वचषकात खेळल्या गेली होती.
या सामन्यात भारतीय संघ ३३५ धावांचा पाठलाग करत असताना गावसकर यांनी १७४ चेंडूत ३६ धावांची संथ खेळी उभारली होती. ज्यामुळे त्यांच्यावर नंतर टीका देखील झाली होती. शास्त्री यांनी या ट्विटमध्ये युवराज सिंग याने मारलेल्या ६ षटकारांचा देखील उल्लेख केला आहे. युवराजने हे ६ षटकार २००७ सालच्या टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात मारले होते.
महत्वाच्या बातम्या:
केवळ २६ धावा अन् रोहित ठरणार हा विक्रम करणारा विराटनंतरचा दुसराच भारतीय
बडे मिया-छोटे मिया गाण्यावर धवन-सूर्यकुमारची जबरा ऍक्टिंग, मोठमोठे अभिनेतेही पडतील फिके
थाला इज बॅक! नेटमध्ये धोनी करतोय गोलंदाजांची धुलाई, पाहा व्हिडिओ