निवड समिती आणि भारतीय क्रिकेट संघ यांच्यातील वादाच्या वार्ता हल्ली दिसल्या आहेत. हल्लीच विराट कोहलीला वनडे संघाच्या नेतृत्त्वपदावरुन काढून टाकल्यानंतर उफाळलेला वाद (Virat Kohli’s Controversy). या वादाच्या बरेच दिवस अनेक चर्चा झाल्या. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला होता. निवडकार्त्यांनी दीड तासापूर्वी याच्याबद्दल त्याला सांगितले होते. त्यानंतर या निर्णयावर स्पष्टीकरण देताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आम्ही त्याला कर्णधार पद न सोडण्याची विनंती केली असल्याचे सांगितले होते. पुढे असे काहीही झाले नसल्याचे विराटने सांगितले होते. या वक्तव्यामुळे वादाला अजून तोंड फुटले होते.
यानंतर आत्ता रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी संघ निवडीबाबत एक नवीन वक्तव्य केले आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार यांना विशेष अधिकार देण्याची मागणी रवी शास्त्री यांनी केली आहे. मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्या विचारांना महत्त्व आणि त्यांना मत मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे असे त्यांचे मत आहे.
माध्यमांशी बोलताना रवी शास्त्री काय म्हणाले?
“मला वाटते की, संघ निवड करताना प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या मताला प्राधान्य दिले पाहिजे. खासकरून जर तुमच्याकडे खूप अनुभवी प्रशिक्षक असेल. जेव्हा निवडकर्ते अधिकृत संघाची घोषणा करतात, तेव्हा त्यांनी प्रशिक्षक आणि कर्णधाराचे म्हणणे ऐकले पाहिजे. माझ्या काळात मी होतो. सध्या राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून उपस्थित आहे आणि कर्णधारही आहेत, संघ निवडीवेळी त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे,” असे ते म्हणाले.
पुढे रवी शास्त्री 2019च्या विश्वचषकातील अपयशाबाबत म्हणाले की, “मला संघात 3 यष्टिरक्षकांचा समावेश करण्याचा मुद्दा समजला नाही. त्याऐवजी आम्ही एक अतिरिक्त फलंदाज घेऊन संघाला यश मिळवून देऊ शकलो असतो. जे आम्ही मिळवू शकलो नव्हतो (विश्वचषक) ते त्यावेळी मिळू शकले असते, पण निवडीत प्रशिक्षक आणि कर्णधाराची भूमिका नसल्याने आम्ही त्यावर काहीही बोलू शकलो नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या हरनुरला मिळालाय क्रिकेटचा वारसा; अजोबा, वडील, काका देखील क्रिकेटर
नाद करायचा नाय! कोहली अँड कंपनीने सेंच्यूरियन कसोटी जिंकत रचलाय मोठा इतिहास
सेंच्यूरियन कसोटी फत्ते करत आशियाच नव्हे आशियाबाहेरही चमकली विराटसेना, केला ‘हा’ शानदार किर्तीमान
हेही पाहा-