---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधील मुंबईच्या खराब कामगिरीनंतर भडकले रवी शास्त्री; तिखट शब्दात केली कानउघडणी

On: मंगळवार, डिसेंबर 28, 2021 11:36 AM
ravi-shashtri
---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधील नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy 2021) हिमाचल प्रदेश संघाने विजय मिळवला. मुंबई संघाचे विजय हजारे ट्रॉफीतील प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले. मुंबई संघ देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये लीग स्टेजमधून बाहेर झाला होता. अशात भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीं (ravi shastri) यांनी मुंबई संघाच्या प्रदर्शनाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, “मी भले भारतीय संघाचा प्रशिक्षक राहिलो आहे आणि जगभरात फिरलो आहे. मी जेव्हा टीव्हीवर काय करायचो, तेव्हाही मी मुंबई क्रिकेटवर नजर ठेवायचो. कारण मी त्या मुंबईचा खेळाडू आहे, ज्याला जिंकणे आवडते.”

पुढे बोलताना शास्त्री म्हणाले, “जेव्हा मी असे निकाल पाहतो, ज्यामध्ये पॉंडेचेरीने मुंबईला पराभूत केले आहे. तेव्हा निराशा होते. असे नाहीये की तो साधारण संघ आहे. कोणताही संघ कोणत्याही दिवशी पराभूत होऊ शकतो, पण यावरून तुम्हाला समजते की, कुठेतरी काहीतरी समस्या आहे. जेव्हा हिमाचल प्रदेशसारखा संघ कोणत्याही मोठ्या खेळाडूशिवाय अंतिम सामना जिंकतो आणि मुंबई तिथपर्यंत पोहचू देखील शकत नाही. तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारावे लागतात.”

“मला वाटते की, मुंबईसाठी खेळणारे अनेक खेळाडू गोष्टींना हलक्यात घेतात. त्यांना वाटते की, जर त्यांच्याकडे मुंबईचा शिक्का आहे, तर ते जिंकतील, पण तसे नसते. तुम्हाला खेळाचा सन्मान करावा लागतो. खेळाच्या नियमांचा सन्मान करावा लागतो, तुम्ही कुठून आला आला आहात त्याचा सन्मान करावा लागतो आणि एका संघाप्रमाणे खेळावे लागते. हा मुंबईचा संघ अभिमानाने खेळतो.,” असे शास्त्रींनी पुढे बोलताना सांगितले.

तत्पूर्वी, रवी शास्त्री देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळले आहेत. त्यांनी १९९३-९४ साली मुंबई संघासोबत खेळताना रणजी ट्रॉफी जिंकली होती. दरम्यान, रवी शास्त्रीचा मागच्या काही दिवसांपूर्वी भारतीय संघासोबतचा प्रवास संपला. टी२० विश्वचषक संपल्यानंतर शास्त्रींचा संघासोबतचा मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ संपणार होता आणि विश्वचषक संपल्यानंतर ते या जबाबदारीतून मुक्त झाले.

महत्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: मुलाखतीत व्यस्त असलेल्या वुडसोबत स्टोक्सची मस्ती; चिडून गोलंदाज म्हणाला, ‘बंद कर ते’ 

…म्हणून भारतीय खेळाडूंनी पाळले मौन, तर साऊथ आफ्रिकन क्रिकेटर्सने दंडावर बांधली काळी पट्टी

उन्मुक्त चंदनंतर आणखी एका खेळाडूने निवृत्ती जाहीर करत सोडला देश; आता अमेरिकेकडून खेळणार क्रिकेट

व्हिडिओ पाहा –

करिअरच्या लास्ट बॉलवर फलंदाजांना त्रिफळाचित करणारे गोलंदाज । 5 Legends take Wicket on Last Ball

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---