2019 साली इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंच्या शारिरीक तंदूरूस्तीला प्राधान्य देत प्रशिक्षक रवी शास्त्रींनी यो-यो टेस्टची काठीण्य पातळी वाढवण्याचा प्रस्ताव संघ व्यवस्थापनासमोर मांडला आहे.
सध्याच्या नियमांप्रमाणे यो-यो टेस्ट पास होण्यासाठी खेळाडूंना 16.1 गुण मिळवावे लागतात. पण रवी शास्त्रींनी पास होण्याचे गुण 16.1 वरून 16.3 करावे असा प्रस्ताव संघव्यवस्थापणासमोर मांडला आहे.
रवी शास्त्रींनी हा प्रस्ताव भारताचे येत्या काळातील परदेश दौैरे आणि 2019 एकदिवसीय विश्चषकाचा विचार करून मांडला आहे.
त्याचबरोबर यो-यो टेस्ट मध्ये फेल होणाऱ्या खेळाडूंचा भविष्यात संघ निवडताना विचार होणार नाही.
बीसीसीआयने यो-यो टेस्टचा अवलंब केल्यापासून अनेक खेळाडूंना या टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे संघातील स्थान गमवावे लागले आहे.
यामधे संजू सॅमसन, मोहम्मद शमी, सुरेश रैना आणि युवराज सिंगचा समावेश आहे. यापैकी सुरेश रैनाने डिसेंबरमध्ये झालेली यो-यो टेस्ट पास केली आहे.