भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयचा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (23 जानेवारी) पार पडला. 2022-23 हंगामासाठी सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरुष शुबमन गिल ठरला. तर 2022-23 हंगामासाठी सर्वोत्तम क्रिकेटपटू महिला दीप्ती शर्मा ठरली. यावेळी बीसीसीआयकडून भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही खास पुरस्कार देऊ सन्मानित केले गेले.
रवी शास्त्री भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू अनेकदा त्यांनी संघासाठी मॅच विनरची भूमिका पार पाडली आहे. त्याचसोबत शास्त्रींच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने अनेक महत्वाचे सामने आणि मालिका देखील जिंकल्या आहेत. एकंदरीत पाहता भारतीय क्रिकेटमधील शास्त्रींचे योगदान नक्कीच मोलाचे ठरते. याच पार्श्वभूमिवर शास्त्रींना बीसीसीआयकडून सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
🗣️🗣️ 𝙄𝙩’𝙨 𝙖 𝙫𝙚𝙧𝙮 𝙩𝙤𝙪𝙘𝙝𝙞𝙣𝙜 𝙢𝙤𝙢𝙚𝙣𝙩 𝙛𝙤𝙧 𝙢𝙚@RaviShastriOfc on winning the Col. C.K. Nayudu Lifetime Achievement Award 🏆👌#NamanAwards pic.twitter.com/WHCpKHo3SJ
— BCCI (@BCCI) January 23, 2024
Mr. Ravi Shastri receives the prestigious 𝗖𝗼𝗹. 𝗖.𝗞. 𝗡𝗮𝘆𝘂𝗱𝘂 𝗟𝗶𝗳𝗲𝘁𝗶𝗺𝗲 𝗔𝗰𝗵𝗶𝗲𝘃𝗲𝗺𝗲𝗻𝘁 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 🏆
Many congratulations 👏👏#NamanAwards | @RaviShastriOfc pic.twitter.com/KhvASeWC5w
— BCCI (@BCCI) January 23, 2024
रवी शास्त्री यांनी 1983 साली वनडे विश्वचषक जिंकताना संघासाठी योगदान दिले होते. 61 वर्षीय शास्त्रींनी आपल्या कारकिर्दीतील 80 कसोटी आणि 150 वनडे सामने खेळले. काही काळासाठी भारतीय संघाच्या कर्णधाराची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर षटकातील प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा विक्रम आहे. त्यांनी सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. शास्त्री 2017ते 2016 दरम्यान भारतीय संघाचे मार्गदर्श होते. पुढे 2017 मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रशिक्षक म्हणू शास्त्रींनी संघात अनेक सुधार केले. पण दरम्यानच्या काळात भारताला विश्वचषक जिंकता आला नाही. (Ravi Shastri was given the BCCI Lifetime Achievement Award)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! शुबमन गिल ठरला सर्वोत्तम क्रिकेटपटू, बीसीसीआयकडून पुरस्कार घोषित
IND vs ENG । केएल राहुल विकेटकिपिंग करणार नाही! हैदराबाद कसोटीआधी मोठी बातमी