आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीकडून मंगळवारी (23 जानेवारी) 2023चा वनडे आणि कसोटी संघ घोषित केला गेला. तसेच सोमवारी (22 जानेवारी) आयसीसीने टी-20 संघाचीही घोषणा केली होती. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांचे खेळाडू सामील आहेत. पाकिस्तान संघ देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक बलाढ्य संघ मानला जातो. पण आयसीसीने निवडलेल्या कसोटी, वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय संघांमध्ये एकही पाकिस्तानी खेळाडू दिसत नाहीये.
होय, पाकिस्तान संघाचे मागचे वर्षातील प्रदर्शन समिश्र राहिले. सोमवार आणि मंगळवारी जेव्हा आयसीसीने 2023 मध्ये सर्वत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचे संघ घोषित केले गेले, तेव्हा या संघांमध्ये एकही पाकिस्तानी खेळाडू नव्हता. एकही पाकिस्तानी खेळाडू या तीन पैकी एकही संघत नसल्याने, चाहते आणि जाणकार आश्चर्य व्यक्त करत आहेत. (There is no Pakistani player in the 2023 ICC Test, ODI and T20i Team)
No Pakistani player in ICC Test, ODI and T20I Team of the Year 2023.#ICCAwards
— Kausthub Gudipati (@kaustats) January 23, 2024
आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय संघ 2023 –
यशस्वी जयस्वाल, फिल साल्ट, निकोलस पुरन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रामजानी, मार्क ऍडेयर, रवी बिश्नोई, रिचर्ड नगारवा, अर्शदीप सिंग.
आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर 2023 –
रोहित शर्मा, शुबमन गिल, ट्रेविस हेड, विराट कोहली, डॅरिल मिचेल, हेनरिक क्लासेन, मार्को जेन्सन, ऍडम झॅम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
आयसीसी कसोटी संघ 2023 –
उस्मान ख्वाजा, दिमूथ करुणारत्ने, केन विलियम्सन, जो रुट, ट्रेविस हेड, रविंद्र जडेजा, ऍलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, मिचेल स्टार्क, स्टुअर्ट ब्रॉड.
महत्वाच्या बातम्या –
अर्रर्र! आयसीसी टेस्ट टीम ॲाफ द ईअरमध्ये फक्त 2 भारतीय, रोहित-विराटलाही मिळाले नाही स्थान
BREAKING! आयसीसी 2023 वनडे टीमची घोषणा, 11 पैकी 6 खेळाडू भारतीय