---Advertisement---

अर्रर्र! आयसीसी टेस्ट टीम ॲाफ द ईअरमध्ये फक्त 2 भारतीय, रोहित-विराटलाही मिळाले नाही स्थान

---Advertisement---

मागचे वर्ष ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या चाहत्यांना नेहमी लक्षात राहण्यासारखे होते. ऑस्ट्रेलियन संघाने वनडे विश्वचषक जिंकलाच. पण त्याआधी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही जिंकली. एकंदरीत पाहता वनडे क्रिकेटसह कसोटी क्रिकेटमध्येही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. मंगळवारी (23 जानेवारी) आयसीसी कसोटी संघ घोषित झाला. भारतीय दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना या संघात स्थान न मिळाले नाहीये.

आयसीसीचा 2023 कसोटी संघ समोर आल्यानंतर यात ऑस्ट्रेलियन संघातील पाच खेळाडूंना स्थान मिळाल्याचे दिसले. तर भारतीय संघाच्या केवळ दोन खेळाडूंना संधी मिळाली आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन या दोघांनी भारताकडून आयसीसी कसोटी संघात जागा मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरी, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी आयसीसी कसोटी संघात स्थान मिळवेल आहे.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाने केवळ कसोटीच नाही तर वनडेत देखील जबरदस्त प्रदर्शन केले. जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि वनडे विश्वचषकाचे विजेतेपद मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव केला गेला. दोन्ही वेळी संघ कमिन्सच्या नेतृत्वात खेळत होता. इंग्लंडचा दिग्गज जो रुट आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनाही या संघात सामील केले गेले आहे. श्रीलंकेकडून एकट्या दिमूथ करुणारत्ने याने या संघासाठी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. (Only 2 Indians, Rohit-Virat did not get a place in the ICC Test Team of the Year)

आयसीसी कसोटी संघ 2023 –
उस्मान ख्वाजा, दिमूथ करुणारत्ने, केन विलियम्सन, जो रुट, ट्रेविस हेड, रविंद्र जडेजा, ऍलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, मिचेल स्टार्क, स्टुअर्ट ब्रॉड.

महत्वाच्या बातम्या – 
BREAKING! आयसीसी 2023 वनडे टीमची घोषणा, 11 पैकी 6 खेळाडू भारतीय
ICC Men’s T20I Team of the Year घोषित, सूर्यकुमार यादव बनला कर्णधार, ‘या’ तीन भारतीयांनाही संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---