सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीग खेळली जात आहे. लीगचा २०२२ हंगाम ३ ऑगस्टपासून सुरू झाला असून आतापर्यंत ६ सामने खेळले गेले आहेत. सोमवारी (८ ऑगस्ट) लंडन स्पिरीट्स आणि मॅनचेस्टर ओरिजिनल्स यांच्यात लढत झाली. लंडन स्पिरीट्सने हा सामना मोठ्या अंतराने जिंकला. सामना पाहण्यासाठी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री उपस्थित होतो आणि दोन खास व्यक्तिंशी त्यांची भेट देखील झाली.
रावी शास्त्री (Ravi Shastri) यांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून लॉर्ड्स स्टेडियमवरील एक फोटो शेअर केला आहे. फोटोत त्यांच्यासोबत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Muskesh Ambani) तसेच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) दिसत आहे. अंबानी हे भारतातील आघाडिचे उद्योजक आहेत, तर पिचाई गुगलसारख्या मोठ्या अंपनीचा कारभार पाहतात. क्रिकेटप्रेमींनी शास्त्रीना पहिल्यांदाच या दोन श्रीमंत व्यक्तींसोबत पाहिले असून चाहते फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहे.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये शास्त्रींनी लिहिले की, “दोन खास अशा व्यक्तींसोबत, जे क्रिकेटवर प्रेम करतात – मेकश अंबानी आणि सुंदर पिचाई.”
https://www.instagram.com/p/ChB87LMuh2o/?utm_source=ig_web_copy_link
शास्त्रींच्या पोस्टवर लाईक करणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी, अनेक नेटकरी आहेत ज्यांनी या पोस्टवर मजेशीर कमेट्स केल्या आहेत. चाहत्यांना पिचाई आणि अंबनींच्या संपत्तीविषयी असलेले आकर्षण शास्त्रींच्या पोस्टवरीक कमेंट्समधून समजते. अनेकांनी अशी कमेंट केली आहे की, ‘हा फोटो खूपच महागडा आहे.’ काहींनी म्हटले आहे की, ‘आज तिघेजण मिळून पार्टी करतील.’ तर काहींच्या मते महागडी दारू मागवली जाईल. शास्त्री पिचाई यांच्या खांद्यावर हात देऊन उभे राहिल्यामुळेही काहीजन त्यांच्या आत्मविश्वासाची दाद देत आहेत.
शांस्त्रींनी शेअर केलेल्या फोटोत अंबानी आणि पिचाई यांच्याव्यतिरिक्त एक लहान मुलगाही दिसत आहे. चाहत्यांना या मुलाविषयी अनेक प्रश्न पडले आहेत. मुलाची चेहरापट्टी पिचाई यांच्यासारखी असल्यामुळे अनेकांनी तो पिचाईंचा मुलगा आहे, असे म्हटले आहेत. पोस्टवर १५ तासांमध्ये जवळपास २५ हजार चाहत्यांच्या लाईक्स आल्या आहेत.
शास्त्रींच्या कारकिर्दीचा विचार केला, तर सध्या त्यांचे वय ६० वर्ष आहे. ते भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू आणि नंतर माजी प्रशिक्षक राहिले आहेत. भारतासाठी शास्त्रींनी एकूण ८० कसोटी सामने खेळले आणि ३८३० धावा केल्या. तसेच १५० एकदविसीय सामन्यांमध्ये ३१०८ धावा केल्या. प्रशिक्षकाच्या भूमिकेत देखील त्यांची कामगिरी जबरदस्त होते. शास्त्री प्रशिक्षक असताना भारातने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली आणि अशाच प्रकारचे अनेक विजय मिळवले. असे असले तरी, ते त्यांच्या कार्यकाळात संघाला एकही आयसीसी ट्रॉफी मात्र जिंकवून देऊ शकले नाहीत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघातून बाहेर असलेल्या गोलंदाजाचे इंग्लंडमध्ये जबरदस्त प्रदर्शन, व्हायरल होतोय व्हिडिओ
बुमराह आशिया चषकातून बाहेर, तरीही टीम इंडियाला नाही चिंता! ‘हा’ खेळाडू आहे कारण
रोहित, विराट की धोनी? पाहा कोण झालंय एशिया कपमध्ये सर्वाधिक यशस्वी