भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने 2012 च्या सीबी मालिकेत त्यावेळेचा भारताचा कर्णधार एमएस धोनीने घेतलेल्या निर्णयांवर टीका केली आहे. त्यातच त्याने आता भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही टिकेचा वार केला आहे.
शास्त्रींच्या ‘परदेशात सर्वोत्तम कामगिरी संघ’ या विधानावर गंभीरने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 अशी गमावली होती. तेव्हा अनेक माजी भारतीय क्रिकेटपटूंनी शास्त्रींच्या प्रशिक्षणावर प्रश्न उपस्थित केले होते.
भारतीय संघाची परदेशातील कामगिरी बघता शास्त्रींचे ते विधान किती योग्य असा प्रश्न गंभीरने विचारला आहे. तसेच त्याने शास्त्रींनी अधिक क्रिकेट बघितले नसावे म्हणून हे विधान केले आहे असेही म्हटले आहे.
“भारतीय चाहत्यांनी शास्त्रींचे विधान मनावर घेऊ नये. त्यांनी अधिक क्रिकेट बघितले नसावे म्हणून हे विधान केले आहे”, असे गौतम क्रिकेट नेक्स्टशी बोलताना म्हणाला.
“शास्त्रींचे हे विधान अतिशय बालिश असून भारतीय संघ जरी ती कसोटी मालिका जिंकला असता तरी शास्त्रींनी हे विधान करायला नको होते. त्यांनी संघाला चांगली कामगिरी करा असे म्हणायला हवे”, असेही गंभीर म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या:
–लग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला
–गौतम गंभीरची ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीवर कठोर शब्दात टीका
–मुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला
–भारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक?