ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आठव्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघ सोमवारी (12 सप्टेंबर) जाहीर झाला. यामध्ये अनेक जुने चेहरे दिसले तर काहींचा हा पहिलाच विश्वचषक असणार आहे. रोहित शर्मा याच्या कर्णधारपदाखाली खेळणाऱ्या या भारताच्या 15 जणांच्या संघात तीन तर फिरकीपटूच आहेत. या तिघांपैकी एक रविचंद्रन अश्विन आहे. मात्र एका फिरकीपटूला संघात जागा मिळाली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण या फिरकीपटूने अश्विनपेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
हा फिरकीपटू आहे रवि बिश्नोई (Ravi Bishnoi). त्याने याचवर्षी भारताच्या टी20 संघात पदार्पण केले आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये चांगली कामगिरी केली आहे. या दरम्यान त्याने आर अश्विन (R Ashwin) याच्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 10 टी20 सामन्यांत 16 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो 15व्या आशिया चषकामध्येही होता. त्याने सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध फलंदाजी करताना 2 चौकार फटकारले होते, तर एक विकेटही घेतली होती.
अश्विनची कामगिरी पाहिली तर त्याने मागील टी20 विश्वचषकानंतर आतापर्यंत फक्त सातच टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने आठ विकेट्स घेतल्या. ही आकडेवारी पाहिली तर बिश्नोई हा अश्विनच्या पुढे आहे. यामुळे बिश्नोईने जबरदस्त कामगिरी केली असून सुद्धा त्याला विश्वचषकासाठीच्या मुख्य संघात जागा मिळाली नाही, हे चकीत करणारे ठरत आहे.
त्याचबरोबर मागील टी20 विश्वचषकापासून ते आतापर्यंत युझवेंद्र चहल हा अव्वल क्रमांकाचा फिरकीपटू ठरला आहे. त्याने 17 सामन्यांत खेळताना 20 विकेट्स घेतल्या. त्याला मागील टी20 विश्वचषकात वगळले होते, आता मात्र त्याची विश्वचषकाच्या संघात वर्णी लागली आहे. तसेच रविंद्र जडेजा याच्याजागी भारताच्या टी20 विश्वचषकात अक्षर पटेल याला संघात घेतले आहे. तो मागील टी20 विश्वचषकापासून ते आतापर्यंत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 14 सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या आहेत.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटर अर्जुनने महिला क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीला केले फिल्मी स्टाईल प्रपोज
शमीसह ‘या’ चार खेळाडूंवर बीसीसीआयला नाही विश्वास! टी20 विश्वचषकासाठी घेतले मात्र…
किती गोडंय! आशिया चषकाच्या फायनलदरम्यान दिसली ‘मिस्ट्री गर्ल’, क्यूटनेसने वेधले लक्ष