आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. मायदेशात ही वनडे मालिका खेळली जाणार असून 22 सप्टेंबर रोजी पहिला असेल. सोमवारी (18 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला. मात्र, युजवेंद्र चहल याला पुनरागमनाची संधी मिळालेली नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वांची नजर असेल तर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्यावर. अश्विन याने भारतासाठी शेवटचा वनडे सामना जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. जवळपास 20 महिन्यांनंतर अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून भारतासाठी वनडे सामना खेळणार आहे. अश्विनी याची अचानकपणे संघात एंट्री झाली असली तरी, चहल पुन्हा एकदा दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत चहल भारतीय संघाचा भाग होता. मात्र, त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. आशिया चषक संघात स्थान न मिळाल्याने तो निराश दिसलेला. या आधी देखील चहलसोबत अशा घटना घडलेल्या आहेत. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असताना 2021 टी20 विश्वचषकात त्याला डावलले गेले होते. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात त्याला संघात स्थान दिले गेले मात्र एकही सामना खेळवला नाही. आता देखील सातत्याने तीन वर्ष खेळल्यानंतर विश्वचषकात तो दिसण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. अक्षर पटेल याची विश्वचषक संघात निवड झाल्यानंतर आता वॉशिंग्टन सुंदर व अश्विन यांना पर्याय म्हणून तयार केल्याने चहल याच्यावर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
(Ravichandran Ashwin And Washington Sundar Backups For ODI World Cup Yuzvendra Chahal Chances Over)
महत्वाच्या बातम्या –
मायदेशात परतल्यानंतरही कर्णधार रोहितने जिंकले मन! चाहत्यांसाठी थांबवली आपली मर्सिडीज एस क्लास
बीसीसीआय आणि एनसीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ही! श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संतापला माजी दिग्गज