भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मलिकेतील तिसरा सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. मलिकेत भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. यादरम्यान भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संघात स्थान मिळाले नाही. तिसरा सामना हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जातोय आणि तेथील खेळपट्टी सपाट आहे. अशात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फिरकी गोलंदाजांना याचा फायदा होऊ शकतो. दरम्यान अश्विनने त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक पोस्ट शेअर केली आहे.
अश्विनने केली अशी ट्विटर पोस्ट
अश्विनने गुरुवारी रात्री ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. पोस्टमधील छायाचित्रात तो नेट्समध्ये डाव्या हाताने फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्याने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘दररोज काहीतरी वेगळे प्रज्वलित करण्याची इच्छा कधीच संपत नाही.”
The desire to ignite something different every day never burns out. 🤜 🔥🔥🤩 pic.twitter.com/6U9s7LZpP6
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) August 26, 2021
रविचंद्रन अश्विनने शेअर केलेल्या या ट्विटर पोस्ट आणि त्याच्या कॅप्शनवरून असे दिसते की, त्याने त्याला संघात भेटत नसलेल्या संधीला अनुसरून ही पोस्ट शेअर केली आहे. तो त्याच्याकडे होणाऱ्या सततच्या दुर्लक्षामुळे नाराज असून, त्याला कुठल्याही किंमतीत संघात संधी मिळवायची आहे.
पहिल्या तीन कसोटीत मिळाली नाही संधी
पहिल्या तीन सामन्यात कर्णधार कोहलीने एका तज्ञ फिरकी गोलंदाजाऐवजी अष्टपैलूच्या रूपात रविंद्र जडेजाला संघात संधी दिली. असे असले तरी, याआधी अश्विनने चेन्नईमध्ये कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. हेच कारण असू शकते की, अश्विन फलंदाजीचा जोरदार सराव करत आहे आणि त्याने त्याचा सरावादरम्यानचा फोटो ट्विटरवर शेअर केला.
मागच्या महिन्यात अश्विनने इंग्लंडच्या वातावरणात काउंटी क्रिकेट खेळताना पाच बळी आपल्या नावावर केले होते. त्याच्या या खेळीनंतरही रविंद्ग जडेजाने त्याची संघातील जागा पटकावली आहे आणि त्यामुळेच आता अश्विन फलंदाजीच्या सरावला लागतोय.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी आहे. मलिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत झाला होता. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला. तिसऱ्या सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा इंग्लंडचा संघ प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्ध ३५४ धावांची आघाडी; यापूर्वी ४ वेळा इंग्लंडने घेतलीये मोठी लीड, पाहा काय लागलेत निकाल
तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर फाफ डू प्लेसिस उतरणार पुन्हा मैदानात; ‘या’ संघाचे करणार नेतृत्व
गेलची तोडफोड फलंदाजी! गगनचुंबी षटकाराने तोडली खिडकीची काच, व्हिडिओ तुफान व्हायरल