भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर कसोटी सामना सुरू आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील हा दुसरा सामना भारताच्या बाजूने झुकल्याचे सोमवारी (5 फेब्रुवारी) दिसले. सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडने पाच महत्वाच्या विकेट्स गमावल्या. यादरम्यान, रविचंद्रन अश्विन याने मोठा विक्रम नावावर केला.
इंग्लंडला या सामन्यात विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य मिळाले. तिसऱ्या दिवसाखेर त्यांची धावसंख्या 1 बाद 67 धावा होती. चौथ्या दिवसी विजयापासून 332 धावा दूर होता आणि 9 विकेट्स देखील बाकी होती. इंग्लंड संघ बॅझबॉल क्रिकेट खेळत विजय मिळवण्याची शक्यात होती. पण सोमवारी म्हणझेच सामन्याच्या चौथ्या दिवशी पाहुणा संघ अडचणीत दिसला. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पाच महत्वाच्या विकेट्स इंग्लंडने गमवाल्या. दुपारच्या जेवणाआधी इंग्लंडची धावसंख्या 6 बाद 194 धावा होती.
दिवसाच्या पहिल्या सत्रात रविचंद्रन अश्विन याने दोन विकेट्स घेतल्या. ओली पोप आणि जो रुट हे दोन महत्वाच्या विकेट्स त्याने घेतल्या. यादरम्यान अश्विन इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. त्याने माजी दिग्गज भागवत चंद्रशेखर यांचा विक्रम मोडत यादीत पहिला क्रमांक मिळवला. चद्रशेखर यांच्या नावावर इंग्लंडविरुद्ध 95 कसोटी विकेट्सची नोंद आहे. तर अश्विनने सोमवारी (5 फेब्रुवारी) ओली पोपला रोहित शर्मा याच्या हातात झेलबाद केल्यानंतर इंग्लंडविरुद्ध 97 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. अश्विन सध्या या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. (Ravichandran Ashwin became the Indian bowler who took the most Test wickets against England)
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
97 – रविचंद्रन अश्विन
95 – भागवत चंद्रशेखर
92 – अनिल कुंबळे
85 – बिशन सिंग बेदी
85 – कपिल देव
67 – इशान शर्मा
56 – रविंद्र जडेजा
54 – विनू मांकड
53 – जसप्रीत बुमराह
Most Test wickets for India vs
ENG – R Ashwin*
AUS – R Ashwin
NZ – R Ashwin
SA – Anil Kumble
SL – Anil Kumble
WI – Kapil Dev
PAK – Kapil DevAshwin goes past Chandrashekhar to become leading Test wicket taker for India against England.pic.twitter.com/PoHw8b8Prf
— Kausthub Gudipati (@kaustats) February 5, 2024
सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय विरुद्ध
इंग्लंड – रविचंद्रन अश्विन*
ऑस्ट्रेलिया – रविचंद्रन अश्विन
न्यूझीलंड – रविचंद्रन अश्विन
दक्षिण आफ्रिका – अनिक कुंबळे
दक्षिण आफ्रिकी – अनिल कुंबळे
वेस्ट इंडीज – कपिल देव
पाकिस्तान – कपिल देव
अश्विन याआधी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज होता. आता या यादीत इंग्लंड संघ नव्याने सामील झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बालपणी आर्मीत जाण्याची स्वप्ने पाहणारा भुवी आज आहे भारताचा नामवंत क्रिकेटर, वाचा त्याच्याबद्दल 10 खास गोष्टी । Bhuvneshwar Kumar Birthday
विराटच्या जवळच्या मित्रानेच मोडला त्याचा विक्रम, पण क्रिकेटप्रेमी झालेत खूश, कौतूकाचा होतोय वर्षाव, जाणून घ्या!