टॉप बातम्याक्रिकेटखेळाडू

बालपणी आर्मीत जाण्याची स्वप्ने पाहणारा भुवी आज आहे भारताचा नामवंत क्रिकेटर, वाचा त्याच्याबद्दल 10 खास गोष्टी । Bhuvneshwar Kumar Birthday

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा आज(5 फेब्रुवारी) 34वा वाढदिवस आहे. सध्या हा खेळाडू दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. साल 2012 ला भारतीय संघातून पदार्पण करणाऱ्या भुवनेश्वरने त्याच्या कारकिर्दीत 21 कसोटी सामने, 121  वनडे आणि 87 आंतरराष्ट्रीय टी-20सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 63, वनडेत 141 आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 90 विकेट्स घेतल्या आहेत. मागील काही काळापासून तो सातत्याने दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर राहिला आहे.

भारताच्या या वेगवान गोलंदाजाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल या लेखातून काही खास गोष्टी जाणून घेऊ;
– भुवनेश्वर कुमारचा जन्म 5 फेब्रुवारी 1990मध्ये उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे झाला आहे.
– भुवनेश्वरने भारताकडून 25 डिसेंबर 2012 रोजी पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामन्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर केवळ 5 दिवसांनी तो आपला पहिला वनडे सामनाही पाकिस्तानविरुद्ध चेन्नई येथे खेळला, त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याला 2 महिन्यांनी कसोटी संघात स्थान देण्यात आले. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चेन्नई कसोटीत 22 फेब्रुवारी रोजी या खेळाडूने कसोटी पदार्पण केले.
– पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि हरभजन सिंगसारख्या दिग्गजांबरोबर खेळायला मिळाले तर वनडे पदार्पणात गंभीर, सेहवाग, युवी आणि धोनीसारखे दिग्गज संघात होते.

– भुवीने भारताकडून जेव्हा पदार्पण केले तेव्हा तिन्ही प्रकारच्या संघाचे नेतृत्व भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी करत होता हे विशेष.
– कसोटी पदार्पणात त्याने तब्बल 97 चेंडूचा सामना करताना तब्बल 167 मिनिट खेळपट्टीवर ठाण मांडले होते. त्या सामन्यात त्याने द्विशतकी खेळी करणाऱ्या कर्णधार धोनीबरोबर 9 व्या 140 धावांची भागीदारी रचली होती.
– तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये 0 धावेवर बाद करणारा पहिला खेळाडू देखील आहे.
– भुवनेश्वर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाजही आहे.

– साल 2016 आणि 2017 मध्ये आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप सलग दोन वर्ष मिळवणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता.
– भुवनेश्वर कुमारला लहानपणी आर्मी ऑफीसर बनण्याची इच्छा होती. पण पुढे त्याची क्रिकेटची आवड वाढत गेली आणि त्याने क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवली.
– लहानपणी भुवनेश्वरला त्याच्या बहिणीचा क्रिकेट खेळण्यासाठी मोठा पाठिंबा मिळाला. त्याची बहिण रेखा हिनेच त्याला तो 13 वर्षांचा असताना क्रिकेटच्या एका प्रशिक्षण शिबिरात दाखल केले होते.
– भुवनेश्वर कुमारने साल 2017 मध्ये नुपुर नागर हिच्याशी लग्न केले आहे.

अधिक वाचा –
– अर्ध्यात कॉमेंट्री सोडून का गेले होते सुनिल गावसकर? खरं कारण आलं समोर, गावसकरांवर कोसळलाय दुःखाचा डोंगर । Sunil Gavaskar
– बे&%$ कोई भी गार्डन मे घुमेगा; मॉं &%$# सबकी, रोहित शर्माची शिवीगाळ कॅमेऱ्यात कैद
– IND vs ENG । भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंड 253 धावांवर सर्वबाद, एकट्या बुमराहने घेतल्या 6 विकेट्स

Related Articles