भारत आणि बांगलादेश या संघात दुसरा कसोटी सामना ढाका येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशवर 3 गडी राखून मात केली. या विजयाबरोबरच भारताने मालिकाही आपल्या खिशात घातली. भारतीने ही कसोटी मालिका 2-0ने जिंकली. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या विजयात आर अश्विन याने मोलाचे योगदान दिले. या सामन्यात त्याने गोलंदाजीत एकूण 6 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर भारताला विजयासाठी 70हून अधिक धावांची गरज असताना त्याने 42 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता सचिन तेंडूलकरच्या एका विक्रमापासून तो फक्त एक पाऊल मागे आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश या संघात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात आर अश्विन (R. Ashwin) याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. आपल्या कारकीर्दीत भारतीय संघासाठी सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळवणारा आर अश्विन हा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नंतर दुसरा खेळाडू बनला आहे. अश्विनने आता पर्यंत 18 वेळा सामनावीर आणि मालिकावीर हे पुरस्कार मिळवले आहेत, तर मास्टर ब्लास्टर सचिनने हा कारनामा 19 वेळा केला आहे. सचिनचा हा विक्रम मोडण्यापासून तो केवळ एक पाऊल मागे आहे. अश्विनने या सामन्यात 62 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने 42 धावा केल्या होत्या.
भारताला चौथ्या दिवशी 100 धावांची गरज होती आणि 6 विकेट बाकी होत्या. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने आपल्या 3 विकेट झटपट गमावल्या. त्यामुळे भारतीय संघ पराभवाच्या मार्गावर दिसत होता. भारताच्या शेवटच्या अपेक्षा या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) वर टीकून होत्या. अशातच आर अश्विन संकटमोचक म्हणून भारतासाठी धावून आला आणि बांगलादेशच्या तोंडाशी आलेला घास त्याने हिरावून घेतला. या डावात भारताचेे 5 फलंदाजी एकेरी धावसंख्येवर बाद झाले होते. बांगलादेश विरुद्ध ही मालिका जिंकल्यामुळे भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत फायदा होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलला तोडावी लागली धोनीची परंपरा, मालिका विजयानंतर ‘या’ खेळाडूच्या हातात सोपवली ट्रॉफी
नॉर्मल वाटलो का! अश्विनने 2022मध्ये कसोटीत चोपल्या विराट अन् श्रेयसपेक्षा जास्त धावा, आकडा वाचाच