भारताचा अनुभवी फिरकीपटू गोलंदाज रवीचंद्रन अश्विन आज मंगळवारी (17 सप्टेंबर) 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. अश्विनने त्याच्या कारकिर्दीत भारताला अनेक अविस्मरणीय कसोटी सामन्यात विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. सध्या अश्विन आयसीसी क्रमवारीत कसोटीमध्ये अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. तसेच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अश्विनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात खरंतर एक सलामी फलंदाज म्हणून केली होती. पण एकदा त्याला मोठी दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याच्या आईने त्याला फिरकी गोलंदाजी करण्याच सल्ला दिला. तेव्हा पासून तो ऑफ स्पीनर म्हणून करिअरला सुरुवात केली. त्याने केवळ क्रिकेटच खेळले असे नाही तर तो इंजिनियर देखील आहे. विशेष म्हणजे जेव्हा त्याला चेन्नई सुपर किंग्सने संघात घेतले होते. तेव्हा तो इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. अश्विनची कॅम्पस प्लेसमेंटमधून एमएसीच्या कॉगन्सिझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स यांनी नोकरीसाठी निवडही केली होती. त्यामुळे एकाचवेळी त्याच्याकडे आयपीएलचा करार आणि नोकरीची ऑफर हातात होती. पण त्याने क्रिकेटचा रस्ता निवडला.
2⃣8⃣1⃣ intl. matches
7⃣4⃣4⃣ intl. wickets 🙌
3⃣6⃣ five-wicket hauls in Test Cricket 👏
5⃣ intl. centuries 💯ICC Men’s Cricket World Cup 2011 & ICC Champions Trophy 2013 Winner 🏆
Here’s wishing @ashwinravi99 a very Happy Birthday 🎂👏 #TeamIndia pic.twitter.com/vOZCaWYV7J
— BCCI (@BCCI) September 17, 2024
अश्विनच्या क्रिकेट करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2015 पर्यंत चेन्नईचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर तो किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्सकडून खेळला. यादरम्याने त्याने 2010 मध्ये भारतासाठी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले. त्याने भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केले आहे.
अश्विनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरबद्दल बोलायचे झाले तर, अश्विनने कसोटीत 100 सामन्यांमध्ये 516 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 5 शतकांसह 3309 धावाही केल्या आहेत. तर वनडेत 116 सामन्यांत त्याने 156 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 65 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 72 विकेट्सही घेतल्या.
अश्विन हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 बळी घेणारा गोलंदाज आहे. यानंतर तो सर्वात वेगवान 100 कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्यानंतर पुढे जात अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद 150, 200 बळी, 250 बळी, 300 बळी, 350 बळी, 400 बळी, 450 बळी आणि 500 बळी घेणारा खेळाडू ठरला. अश्विनचा हा विक्रम खरोखरच अनोखा आहे. त्याने अन्य कोणत्याही भारतीय गोलंदाजाला हा विक्रम टिपण्याची संधी दिली नाही.
अश्विन हा अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत 500 विकेट्स घेणारा भारताचा दुसराच गोलंदाज आहे. कुंबळेंनी 132 सामन्यांत 619 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने आत्तापर्यंत कसोटीत 36 वेळा एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो कसोटीत सर्वाधिकवेळा डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सर रिचर्ड हॅडली यांच्यासह तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे आहे. त्यांच्यापुढे मुथय्या मुरलीधरन (67 वेळा) आणि शेन वॉर्न (37 वेळा) आहेत. अश्विन एकाच कसोटीत शतक आणि एका डावात 5 विकेट्स घेणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने हा विक्रम तीनवेळा केला आहे.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 5 भारतीय गोलंदाज, दिग्गज फलंदाजाचाही समावेश
हॉकीमध्ये ‘पंजा’ पूर्ण करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार, आज यजमान चीनविरुद्ध विजेतेपदाचा सामना
युरोपियन मुलींमध्ये नीरज चोप्राची ‘क्रेझ’, सेल्फीसोबत नंबर मागितला! VIDEO