---Advertisement---

IND vs ENG । अश्विनची 500वी विकेट वडिलांसाठी समर्पित! भारताचा महान गोलंदाज काय म्हणाला पाहाच

Ravichandran Ashwin
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील राजकोट कसोटीत दोन्ही संघ बरोबरीचे आव्हान उभे करताना दिसत आहेत. शुक्रवारी (16 फेब्रुवारी) दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताकडे 238 धावांची आघाडी आहे. पण इंग्लंड संघ हे लीड मोडून काढू शकतो. कारण त्यांच्याकडे अजून 8 विकेट्स बाकी आहेत. रविचंद्रन अश्विनसाठी शुक्रवार खऱ्या अर्थाने खास ठरला. त्याने केलेल्या मोठ्या विक्रमाचे श्रेय अश्विनने आपल्या वडिलांना दिले.

राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या 2 विकेट्सच्या नुकसानावर 207 धावा होती. सलामीवीर बेन डकेट याने इंग्लंडसाठी पहिल्या डावात शतक ठोकले आणि 133* धावांसह तो खेळपट्टीवर कायम आहे. मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली आहे. तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी भारतासाठी ध्रु जुलेर 46, रविचंद्रन अशअविन 37 आणि जसप्रीत बुमराह याने 26 धावांची खेळी केली. गोलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर अश्विनने झॅक क्राऊली याच्या रुपात इंग्लंडला पहिला झटका दिला. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील ही 500वी विकेट होती. भारतसाठी 500 कसोटी विकेट्स घेणारा अश्विन केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेममध्ये अश्विन सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या फिरकीपटू गोलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. नक्कीच कोणत्याही खेळाडूसाठी एवढी मोठी कामगिरी करणे खास असते. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अश्विनने आपल्या 500 विकेट्ससाठी वडिलांना श्रेय दिले. तो म्हणाला, “मला 500 वी विकेट माझ्या वडिलांना समर्पित करायची आहे, ते नेहमीच मला पाठिंबा देणारे महत्वाचे व्यक्ती राहिले आहेत.” दुसरीकडे अश्विनच्या आई-वडिलांनीही त्याचा 500 कसोटी विकेट्स पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

(Ravichandran Ashwin credits his father after taking his 500th Test wicket)

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.

महत्वाच्या बातम्या – 
Ravichandran Ashwin । 500 कसोटी विकेट्ससाठी कट्टर प्रतिस्पर्धी खेळाडूनेही केलं अश्विनचं कौतुक, पाहा व्हिडिओ
Ranji Trophy : ‘या’ इशानचं चाललंय तरी काय…? पुन्हा बीसीसीआयचा आदेश फेटाळला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---