भारत-ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली गेली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 असा पराभव केला. पण या मालिकेत भारताचा डावखुरा फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) खराब फॉर्मचा सामना करावा लागला. तथापि, सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात पंतने तुफानी खेळी केली, परंतु त्याव्यतिरिक्त, या मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक होती. मात्र, आता भारतीय संघाचा माजी ऑफस्पिनर आर अश्विनने पंतबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
आर अश्विन म्हणाला की, रिषभ पंतकडे सर्व शाॅट्स आहेत. रिव्हर्स स्वीप, स्लॉग स्वीप आणि इतर शॉट्स. पण या शॉट्समध्ये समस्या अशी आहे की, त्यात खूप जास्त धोका आहे. तुमचा बाहेर पडण्याचा धोका खूप वाढतो. मला वाटतं हा फलंदाज 200 चेंडू खेळला तर तो प्रत्येक डावात शतक करू शकतो. पण तुम्ही स्वतःवर नियंत्रण कसे ठेवू शकता? पंतसारख्या फलंदाजांसाठी मधला मार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्हाला मध्यम मार्ग शोधावा लागेल. तुम्ही धोकादायक शॉट्स कमी करू शकता.”
सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात रिषभ पंतने (Rishabh Pant) 98 चेंडूत 40 धावा केल्या होत्या. पण यानंतर, दुसऱ्या डावात तो पूर्णपणे वेगळ्या शैलीत दिसला. या डावात त्याने 33 चेंडूत 61 धावांची धमाकेदार खेळी केली. मात्र, सिडनी कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या-
रवींद्र जडेजा कसोटीतून घेणार निवृत्ती? इंस्टाग्राम स्टोरीमुळे चर्चांना उधाण
रोहित शर्मा नाही, तर हा खेळाडू सर्वोत्कृष्ट कर्णधार, माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
RCBच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! बिग बॅश लीगमध्ये ‘या’ स्टार खेळाडूने पाडला धावांचा पाऊस