भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) देशांतर्गत क्रिकेटमध्ये डीआरएस लागू करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 4 संघ खेळत असलेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy) पहिल्यांदाच डीआरएसचा (DRS) वापर केला जात आहे. दुलीप ट्रॉफी सामन्यात इंडिया-डी संघाचा फलंदाज रिकी भुईला एलबीडब्ल्यू बाद दिल्यानंतर अश्विनने प्रतिक्रिया दिली.
रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) सोशल मीडिया एक्स वर लिहिले, “देशांतर्गत क्रिकेटसाठी डीआरएस फक्त योग्य निर्णय घेण्यापुरते मर्यादित नाही. काल संध्याकाळी मानव सुथारच्या गोलंदाजीवर रिकी भुई बाद होणे हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नियम नसता तर फलंदाज बाद होण्यापासून वाचले असते. जुन्या काळी फलंदाजांना नॉट आऊट दिले जायचे कारण ते फ्रंटफूटवर खेळण्यात यशस्वी होत असत.”
पुढे बोलताना अश्विन म्हणाला, “आता तुमची बॅट पॅडच्या मागे ठेवणे घातक ठरू शकते. रिकीला काल मिळालेल्या अनुभवाशिवाय कोणीतरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत असल्याची कल्पना करा. त्याला त्याच्या खेळात कोणते बदल करावे लागतील हे समजण्यासाठी त्याला संपूर्ण कसोटी मालिका लागू शकते. यामुळे त्याची कारकीर्दही संपुष्टात येऊ शकते.”
अश्विनच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 100 कसोटी. 116 एकदिवसीय आणि 65 टी20 सामने खेळले आहेत. 100 कसोटी सामन्यात त्याने 23.75च्या सरासरीने 516 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 2.81 राहिला आहे. 116 एकदिवसीय सामन्यात त्याने 33.20च्या सरासरीने 156 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 25/4 ही त्याची उत्कृष्ट गोलंदाजी राहिली आहे. 65 टी20 सामन्यात त्याने 72 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
तो तुमच्या पाठीमागे बोलत नाही, पाकिस्तानला गंभीरसारख्या कोचची गरज; कुणी केलं विधान?
आता होणार धिंगाणा! पंत जुन्या फॉर्मात परतला, दुलीप ट्रॉफीत झळकावले वेगवान अर्धशतक
19 वर्षीय खेळाडू करणार भारतीय संघात पदार्पण? माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा