भारत आणि बांगलादेश (India And Bangladesh) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी दारूण पराभव केल्या. भारताच्या विजयात स्टार अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) महत्त्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी अश्विनने बांगलादेशविरूद्धच्या विजयानंतर मोठा खुलासा केला आहे.
बांगलादेशविरूद्धच्या शानदार विजयानंतर अश्विनने स्लीपमधील क्षेत्ररक्षणाबाबत सविस्तर सांगितले आहे. अश्विनने या सुधारणेचे श्रेय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांना दिले आहे.अश्विनने सांगितले की, दिलीपने संघाच्या क्षेत्ररक्षणात खूप मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून संघाचे स्लिप क्षेत्र आता अधिक मजबूत झाले आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक असताना टी दिलीप आर श्रीधरच्या जागी भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनले आहेत.
रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) पत्रकार परिषदेत क्षेत्ररक्षणाबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “क्षेत्ररक्षणाबद्दल बोलायचे असेल तर सुरुवात कुठून करावी? सर्वप्रथम दिलीप सरांबद्दल बोलूया. आम्ही इंटरनेटवर त्यांचे नाव शोधले तेव्हा त्यांच्या नावासोबत ‘इंटरनेट सेलिब्रिटी’ येत होते.”
पुढे बोलताना अश्विन म्हणाला, “त्यांची ओळख मात्र इंटरनेट सेलिब्रिटी नाही. ते आमचे ‘सेलिब्रेटी’ क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. ते सुपरस्टार आहेत. एक-दोन वर्षांपूर्वी क्षेत्ररक्षण करताना स्लिपमध्ये झेल घेणे आमच्यासाठी आव्हानात्मक होते पण यशस्वी जयस्वालने या बाबतीत बरीच सुधारणा केली. दिलीपने त्याच्यासोबत खूप मेहनत घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून आतापर्यंत जयस्वालने या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जयस्वाल स्लिपमध्ये तसेच फलंदाजाच्या जवळ क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्या विजयासाठी कानपूर कसोटीत ‘या’ खेळाडूला मिळाली पाहिजे संधी, मांजरेकरांची मागणी
रिषभ पंतच्या धमाकेदार पुनरागमनाबद्दल ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गजाने केले भरभरून कौतुक!
IND vs BAN: दुसऱ्या सामन्यातही विजय फिक्स? कानपूरच्या मैदानावर भारताची आकडेवारी शानदार