विराट कोहली आणि बीसीसीआय (Virat Kohli & BCCI Controversy) यांच्यातील वाद अजून संपलेला नाही, तोच नवा वाद सुरू झाला आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Former Head Coach Ravi Shastri) यांच्या एका जुन्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २०१८ मधील ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान शास्त्री यांनी कुलदीप यादवचे नंबर वन फिरकी गोलंदाज म्हणून वर्णन केले होते. (2018 India Tour Of Australia)
तेव्हा मी निवृत्तीचा विचार करत होतो
आता अश्विनने या वक्तव्यावर खेद व्यक्त केला आहे. अश्विनने मंगळवारी एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, “२०१८ च्या दौऱ्यात माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मला वाटले की, मला खाली चिरडले जात आहे. त्यानंतर मी स्वत:ला संघापासून अलिप्त पाहत होतो. मी एकटा पडल्यासारखे वाटले. तो माझ्या कारकिर्दीतील इतका वाईट काळ होता की, मी निवृत्तीचा विचारही केलेला.” (Ravichandran Ashwin On Retirement)
सन २०१८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कुलदीप यादव याने सिडनी कसोटीत पहिल्या डावात पाच बळी घेतले होते. यानंतर शास्त्री म्हणाले की, परदेशात कुलदीप भारताचा नंबर वन फिरकीपटू आहे. प्रत्येकाची वेळ येते, असे शास्त्री म्हणाले होते. कुलदीपच्या कामगिरीनंतर अश्विनला फक्त भारतीय खेळपट्ट्यांवरील गोलंदाज म्हणून मानले जात होते. (Kuldeep Yadav Sydney Test)
अश्विनने कसोटीत आतापर्यंत ४२७ बळी घेतले आहेत. तो पुढे म्हणाला, “मी रवीभाईंचा खूप आदर करतो. आम्ही सर्वजण ते करतो. माझा विश्वास आहे की आम्ही काही गोष्टी सांगतो आणि नंतर त्या परत घेतो. मात्र, त्या एका क्षणात मी स्वतःला पूर्णपणे तुटलेला समजत होतो. कुलदीपसाठी मी आनंदी होतो. मी एका डावात पाच बळी घेऊ शकलो नाही, परंतु, त्याने ते मिळवले. मला माहित आहे की, ही किती मोठी उपलब्धी आहे.”
तो मोठा विजय
“ऑस्ट्रेलियात जिंकणे आनंददायी होते. परंतु मला असे वाटले की मी परदेशी भूमीवर चांगली कामगिरी करू शकत नाही. मी एकटा पडलेलो, माझे त्या विजयात योगदान नव्हते. मी माझ्या रूममध्ये गेलो आणि माझ्या बायकोशी बोललो. माझी मुलंही तिथे होती. मग आम्ही अशा गोष्टी बाजूला ठेवल्या. मी पार्टीला गेलो कारण आम्ही एकत्र आलेलो. हा एक मोठा विजय होता.”
सध्या अश्विन भारताचा पहिल्या पसंतीचा फिरकीपटू आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
यशस्वी भव! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाला मिळाला ‘मास्टर क्लास’
टीकांचा धनी ठरलेल्या रुटच्या मदतीला धावला ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
विनोद कांबळीने निवडले फॅब फोर; विराट वगळता सर्वच नावे चकित करणारी