रविचंद्रन अश्विन भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान गोलंदाज आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत नुकत्याच स्वतःच्या 500 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. या मोठ्या पराक्रमासाठी जगभारतून फिरकीपटू गोलंदाजाला शुभेच्छा मिळाल्या. या मोठ्या विक्रमानंतर काहीच दिवसांमध्ये अश्विनने माजी भारतीय दिग्गज एमएस धोनी याचे आभार मानले.
एमएस धोनी (MS Dhoni) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी अनेक वर्ष भारतासाठी एकत्र क्रिकेट खेळले. त्याचसोबत इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठीही अश्विन धोनीच्या नेतृत्वात खेळला. अश्विनला आयपीएल कारकिर्दीची सुरुवातच सीएसकेसोबत झाली होती.
अश्विनने धोनीविषयी नुकतीच एक प्रतिक्रिया दिली. यात धोनीविषयी त्याच्या मनात असलेला आदर दिसून आला. अश्विनने म्हटल्याप्रमाणे जेव्हा तो नवखा क्रिकेटपटू होता, तेव्हा धोनीने त्याला अनेक मोठ्या संधी दिल्या. खासकरून आयपीएलमध्ये सीएसकेचे ड्रेसिंग रुम शेअर करायला मिळणे, अश्विनसाठी खूपच महत्वाचे ठरले. त्यावेळी सीएसकेमध्ये मॅथ्यू हेडन, एमएस धोनी आणि मुथय्या मुरलीधरन अशा दिग्गजांचा समावेश होता. 500 कसोटी विकेट्स घेणारा दुसरा भारतीय बनल्यानंतर तामिळनाडू सरकारकडून अश्विनला सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात त्याने धोनीचा उल्लेख केला.
तामिळनाडू सरकारकडून सन्मान मिळाल्यानंतर अश्विन म्हणाला, “मी 2008 साली चेन्नई सुपर किंग्जच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्व महान क्रिकेटपटूंना भेटलो होतो. यात मॅथ्यू हेडन आणि एमएस धोनी होते. त्यावेळी मी काहीच नव्हतो. पण तरीही अशा संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, ज्यात मुथय्या मुरलीधरनसारखे गोलंदाज होते. एमएस धोनीने मला जे दिले आहे, त्यासाठी संपूर्ण आयुष्यभर त्याचा आभारी राहीन. ख्रिस गेलविरुद्ध नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी त्यानेच मला दिली होती.”
दरम्यान, अश्विनला तामिळनाडू सरकारकडून मिळालेल्या हा सन्मान मिळाला, तेव्हा राहुल द्रविड देखील तिथे उपस्थित होता. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या राहुल द्रविडनेही अश्विनचे कौतुक केले. अश्विनची क्रिकेट कारकिर्द इतक्यात संपली नाही, अशी मला अपेक्षा आहे. त्याने आपल्या मेहनत, समर्पण आणि नावीन्यामुळे फिरकी गोलंदाजीला वेगळी उंची मिळवून दिली, असे द्रविड यावेळी म्हणाला. (Ravichandran Ashwin is thankful to MS Dhoni for this)
महत्वाच्या बातम्या –
असं केलं तर सॅमसन टी-20 विश्वचषक खेळणार! माजी क्रिकेटपटूकडून मिळाला सल्ला
पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी शेन वॉटसनचा नकार, समोर आले मोठे कारण