आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या क्रमवारीत पुन्हा एकादा रविचंद्रन अश्विन डंका पाहिला मिळत आहे. त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकले आणि जगातील नंबर वन गोलंदाज बनला. त्याचवेळी जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. याबरोबरच आर अश्विन याने इंग्लंड विरुद्ध या कसोटी मालिकेत 500 विकेट्सचा टप्पा गाठला. तसेच अश्विन धर्मशालेत इंग्लंड विरुद्ध कारकीर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळला आहे.
याबरोबरच आयसीसी दर बुधवारी क्रमवारी जाहीर करत असते. यामध्ये अश्विन व्यतिरिक्त कुलदीप यादव यालाही जबरदस्त फायदा झाला आहे. कुलदीपने इंग्लंड विरुद्ध पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. सध्या अश्विनच्या नावावर आता 870 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर जसप्रीत बुमराहला संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. तसेच बुमराहसोबत ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड देखील दुसऱ्या स्थानावर असून या दोघांच्या नावावर प्रत्येकी 847 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.
रवींद्र जडेजा याने बॉलिंग रँकिंगमधील आपलं सातवं कायम राखण्यात यश मिळवलंय आहे. तर कुलदीप यादवने 15 स्थानांची झेप घेत 16 व्या क्रमांकावर आला आहे. आयसीसीच्या बॉलिंग रँकिंग 20 मध्ये अशाप्रकारे टॉप 4 गोलंदाजंचा समावेश झाला आहे.तसेच आयसीसी टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा केन विलियमसन पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर जो रुट दुसऱ्या क्रमांकावर आहे.
🇮🇳 🔁 🇮🇳
A new No.1 bowler has been crowned in the ICC Men's Test Player Rankings after the #INDvENG series 🎖
— ICC (@ICC) March 13, 2024
दरम्यान, पाकिस्तानचा बाबर आझम पाचव्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. त्यानंतर डॅरेल मिचेल आणि स्टीव्ह स्मिथ चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला 5 स्थांनाचा फायदा झालाय. रोहित 10 व्या वरुन पाचव्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे. धर्मशालेत इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीत शतक ठोकल्याचा फायदा रोहितला रँकिंगमध्ये झाला आहे. तसेच आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाची युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल 740 गुणांसह आठव्या स्थानावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- क्रिकेट म्हणजे ‘जंटलमन्स गेम’! पंचानं बाद देण्याआधीच अजिंक्य रहाणे पॅव्हेलियनच्या दिशेनं निघाला, पाहा व्हिडिओ
- IPL 2024 पूर्वी बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई, RCB चे सामने कुठे खेळले जाणार?