भारतीय संघाचा (team india) दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) सध्या भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत बोलताना अश्विनने पाकिस्तान संघातील त्याच्या आवडत्या खेळाडूचा खुलासा केला आहे.
अश्विनने पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम, यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी यांचे कौतुक केले. यावेळी तो म्हणाला की, “मी नेहमीच मोहम्मद रिझवानविषयी बोलत आलो आहे आणि त्याच्याविषयी मी म्हटलो देखील आहे की, ज्याप्रकारे तो गुणवत्ता घेऊन आला आहे आणि महत्वाची खेळी केली आहे, मला वाटते की, तो संघाचा सर्वात उत्कृष्ट फलंदाज आहे. बाबर आझम देखील कौतुकास पात्र ठरतो.”
अश्विनने पुढे शाहीन शाह अफ्रिदीचेही कौतुक केले. त्याच्या मते पाकिस्तान संघाकडे पहिल्यापासूनच गुणवंत खेळाडू राहिले आहेत आणि आता यामध्ये अधिक वाढ झाली आहे. “शाहीन शाह अफ्रिदी देखील खरा प्रतिभावान आहे. पाकिस्तानकडे नेहमीच प्रतिभाशाली क्रिकेटपटू राहिले आहेत आणि आता ते काही जास्तच आहेत,” असे तो म्हणाला.
दरम्यान, अश्विनने ज्या तीन पाकिस्तानी खेळाडूंचे कौतुक केले, त्यांच्यामुळे भारताला टी२० विश्वचषकात पाकिस्तानने पराभूत केले होते. पाकिस्तानने २४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुबईत खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकातील सामन्यात भारताचा दारुण पराभव केला होता. शाहीन अफ्रिदीने भारतीय संघाच्या वरच्या फळीला उद्धस्त केले होते. तर आझम आणि रिझवान या सलामीवीर जोडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विरोधी संघाने भारताला १० विकेट्स राखून पराभूत केले होते.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाच्या सरावाला सुरुवात
भारतीय संघ आगामी मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे आणि त्याठिकाणी विलगीकरणाचा कालावधी देखील पूर्ण केला आहे. उभय संघातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) पासून खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी संघाने जोहान्सबर्ग येथे सरावाला सुरुवात केले आहे. बीसीसीआयने संघाच्या पहिल्या सराव सत्राचा व्हिडिओ त्यांच्या ट्वीटर खात्यावरून शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ मध्ये सुपरफ्लॉप! तरीही, मेगा लिलावात कोट्याधीश बनू शकतात ‘हे’ टी२० स्पेशालिस्ट