भारतीय संघ शेवटच्या वेळी श्रीलंका दौऱ्यावर वनडे मालिकेत खेळताना दिसला होता, ज्यामध्ये त्यांना 2-0 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेनंतर रोहित शर्मा ब्रिगेडला जवळपास दीड महिन्यांचा ब्रेक मिळाला आहे. आता भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मायदेशातील मालिकेद्वारे पुन्हा मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली असून त्यात अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) नावाचाही समावेश आहे. या मालिकेत मोठी कामगिरी करण्याची संधी त्याला मिळणार आहे.
खरे तर, भारत आणि बांगलादेश यांच्यातील ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 35 सामन्यांच्या 67 डावांमध्ये 20.43 च्या सरासरीने 174 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत पॅट कमिन्स दुसऱ्या स्थानावर असून त्याने 175 विकेट्स घेतल्या आहेत.
तर जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा नाथन लियॉन अव्वल स्थानावर आहे. लियॉनने 43 सामन्यात 187 विकेट घेतल्या आहेत. अश्विनला पॅट कमिन्सला मागे टाकण्यासाठी फक्त दोन विकेट्सची गरज आहे. त्याचवेळी अश्विन लियॉनला पछाडत जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमधील नंबर 1 गोलंदाज होण्यापासून 14 विकेट्सने दूर आहे. अश्विनकडे आगामी कसोटी मालिकेतील चार डावांत 14 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेत अव्वलस्थानी विराजमान होण्याची सुवर्णसंधी आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेचे वेळापत्रक
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसरा सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कानपूर येथे होणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा चेन्नईमध्ये सराव शिबिर आयोजित केला जाईल, ज्यासाठी काही नेट गोलंदाजांनाही संघात सामील होण्यास सांगितले आहे. दुसरीकडे बांगलादेशने अलीकडेच कसोटी मालिकेत पाकिस्तानला 2-0 ने पराभूत केले होते. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावलेले असेल.
हेही वाचा-
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन बनला संघमालक, खरेदी केला ‘या’ टीमचा हिस्सा
ऑस्ट्रेलियाची मोठी खेळी, भारताविरुद्ध हा फलंदाज करणार सलामी बाॅर्डर-गावस्कर मालिकेसाठी संघाची नवी चाल?
‘विनेश’च्या राजकारणातील प्रवेशामुळे महावीर फोगट दु:खी, म्हणाले ‘तिने सुवर्णपदक….’