रविचंद्रन अश्विनने अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि अप्रतिम प्रदर्शन देखील करून दाखवले आहे. अश्विन मागच्या काही वर्षांपासून भारतीय वनडे आणि टी२० संघातून बाहेर होता, पण आता त्याने संघात चांगल्या प्रकारे पुनरागमन केले आहे. अशात अश्विनने भारतीय संघातील यष्टीरक्षक फिरकी गोलंदाजांसमोर यष्टीमागे कसे प्रदर्शन करतात?, याविषयी मत मांडले आहे. तसेच त्याने कोणता यष्टीरक्षक फिरकी गोलंदाजांसमोर चांगले प्रदर्शन करते, याचाही खुलासा केला आहे.
अश्विनने याविषयावर बोलताना भारतीय संघातील तीन यष्टीरक्षकांची नावे सांगितली आहेत. त्याच्या मते संघातील काही यष्टीरक्षकांनी फिरकी गोलंदाजांसमोर चांगले प्रदर्शन केले आहे. यावेळी त्याने माजी कर्णधार एमएस धोनी, दिनेश कार्तिक आणि रिद्धिमान साहा यांची नावे घेतली आहेत. यापैकी एमएस धोनीला त्याने फिरकी विरोधात सर्वोत्तम यष्टीरक्षक निवडले. त्याच्या मते एमएस धोनी कठीण परिस्थितीत सोप्या पद्धतीने विकेट घेऊ शकतो.
अश्विन म्हणाला की, “धोनी, साहा आणि डीके (दिनेश कार्तिक)- या क्रमात तुम्ही याचे उत्तर घेऊ शकता. त्यांना यष्टीपाठी न ठेवणे खूप अवघड आहे.”
अश्विनने दिनेश कार्तिकचेही कौतुक केले, पण धोनीला त्याने या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर ठेवले. तो म्हणाला, “मी दिनेशसोबत खूप क्रिकेट खेळलो आहे, पण मला जर कोणा एकाला निवडायचे असेल तर मला वाटते की, प्रत्यक्षात मी एमएस धोनीला यष्टीपाठी सर्वात उत्तम आहे.”
धोनीला या यादीत पहिल्या क्रमांकावार ठेवताना अश्विनने त्याच्याशी संबंधीत एक उदाहण दिले आहे. त्याने यावेळी चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत पहिल्या दिवशी एड कोवान याला धोनीने कसे बाद केले होते याची आठवण करून दिली. तो म्हणाला, “चेन्नईमध्ये एड कोवानची ही एक विकेट आहे, जेथे तो (धोनी) बाहेर निघतो आणि स्टंपिंग होते. चेंडू वळला नाही, पण बाउंस झाला. एमएस धोनीने चेंडू पकडला केला आणि स्टंपिंग केली. मी क्वचितच त्याला कधी काही मिस करताना पाहिले असेल, मग ती स्टंंपिंग असो, धावबाद असे किंवा झेल असो. तो फिरकीविरुद्ध सर्वात असामान्य यष्टीरक्षकांपैकी एक आहे. साहा देखील यात मागे नाहीय.”
महत्वाच्या बातम्या –
फलंदाज, कर्णधार ते गुरू; रोहितचं एनसीएमध्ये युवा शिलेदारांना मोलाचं मार्गदर्शन, फोटो व्हायरल