---Advertisement---

फलंदाज, कर्णधार ते गुरू; रोहितचं एनसीएमध्ये युवा शिलेदारांना मोलाचं मार्गदर्शन, फोटो व्हायरल

On: शुक्रवार, डिसेंबर 17, 2021 8:44 PM
Rohit-Sharma-Addressing-U19-Team
---Advertisement---

एमएस धोनी, विराट कोहली अशा बऱ्याचशा दिग्गज भारतीय किंवा इतर क्रिकेटपटूंना त्यांच्या मैदानातील प्रदर्शनाबरोबरच मैदानाबाहेरही आपले संघ सहकारी किंवा विरोधी संघातील खेळाडूंसोबत वेळ घालवताना बऱ्याचदा पाहिले गेले आहे. धोनीसारख्या अनुभवी क्रिकेटपटूकडून तर छोटेमोठे सल्ले घेण्यासाठी युवा क्रिकेटपटू तत्पर असतात. आता भारताच्या वनडे आणि टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हादेखील अशीच भूमिका निभावताना दिसला आहे. बीसीसीआयचेनेत्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India Tour Of South Africa) असून उभय संघांमध्ये तिथे ३ सामन्यांची कसोटी आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेला गेले आहेत. परंतु कसोटी संघाचा उपकर्णधार आणि मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार असलेला रोहित मात्र भारतातच थांबला आहे.

या दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत मुंबईत सराव करत असताना त्याचे हॅमस्ट्रिंग (Rohit Sharma Injury) दुखावले गेले आहे. त्यामुळे तो या दौऱ्यातील सुरुवातीच्या कसोटी मालिकेतून (Rohit Ruled Out Of Test Series) बाहेर झाला आहे. परंतु त्यानंतरच्या वनडे मालिकेसाठी तो स्वत:ला सज्ज करतो आहे. आपल्या दुखापतीतून सावरण्यासाठी तो बेंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) अर्थातच एनसीएमध्ये दाखल झाला असून तो तिथे पुनर्वसन प्रक्रियेतून जाईल. याच एनसीएमध्ये सध्या १९ वर्षांखालील भारतीय संघही थांबला आहे. येत्या आशिया चषकाच्या तयारीसाठी हा संघ तिथे सराव करतो आहे.

याच संघातील युवा शिलेदारांसाठी रोहित मार्गदर्शकाची (Rohit Sharma Addresses India’s Under-19 Team) भूमिका बजावताना दिसला आहे. त्याने या संघातील युवा खेळाडूंना त्यांच्या भविष्यासाठी काही मौल्यवान टिप्स दिल्या आहेत. बीसीसीआयने यादरम्यानचे फोटो शेअर करत यासंबंधी माहिती दिली आहे.

“अमूल्य धडे. पांढर्‍या चेंडूच्या क्रिकेटमधील संघांचा कर्णधार रोहित शर्मा याने बंगळुरू येथील एनसीएमधील सराव शिबिरात भारताच्या १९ वर्षांखालील संघाला संबोधित करताना आपला बहुतेक पुनर्वसन वेळ काढला आहे,” असे लिहिले आहे.

रोहितसोबत अष्टपैलू रविंद्र जडेजाही एनसीएमध्ये पुनर्वसनासाठी आला आहे. जडेजा न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

हेड कोच द्रविड यांच्या ‘त्या’ पाऊलानंतर उपस्थित झाले प्रश्न; रोहितसोबत वेगळं वागले, तर विराटसोबत वेगळं

राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: महाराष्ट्राची गाठ आता तमिळनाडूशी

आता सचिनही करणार बीसीसीआयमध्ये एन्ट्री? गांगुली यांचे सूचक वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---