विराट कोहली (virat kohli) याच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ दक्षिण अफ्रिकेत दाखल झाला आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात (south africa tour of india) भारताला तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (rohit sharma) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (ravindra jadeja) मात्र दक्षिण अफ्रिकेत दाखल झालेल्या संघात सामील नाहीत. या दोघांना दुखापत झाली असून ते सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीएस) मध्ये पोहोचले आहेत.
दरम्यान, रोहितचा एनसीएमधील भारताच्या युवा खेळाडूसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताच्या १९ वर्षाखालील संघाच्या कर्णधाराने रोहित आणि जडेजासोबतचा फोटो केला शेअर
रोहित आणि जडेजासह एनसीएसमध्ये सध्या भारताचा १९ वर्षाखालील संघ देखील उपस्थित आहे. भारताच्या १९ वर्षाखालील संघाला २३ डिसेंबरपासून यूएईत खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकात सहभाग घ्यायचा आहे. तत्पूर्वी १९ वर्षाखालील संघ एनसीएमध्ये सराव करत आहे. १९ वर्षाखालील संघासोबत दिल्लीचा यश ढुल (yash dhull) देखील सहभागी आहे आणि १९ वर्षाखालील आशिया चषकात तो भारताचे नेतृत्व करणार आहे. अशात रोहित आणि जडेजा एनसीएमध्ये दाखल झाल्यानंतर यशने त्यांच्यासोबत फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Indian U-19 captain Yash Dhull with Indiann ODI and T20 captain Rohit Sharma. pic.twitter.com/I1aQSQucY2
— Johns. (@CricCrazyJohns) December 16, 2021
https://www.instagram.com/p/CXkRsz1IBEM/?utm_source=ig_web_button_share_sheet
रोहित, जडेजा दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएमध्ये
दरम्यान, रोहित शर्मा आगामी दौऱ्यासाठी संघासोबत मुंबईत सराव करत होता. परंतु सरावादरम्यात त्याला दुखापत झाली आणि कसोटी मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली. तर दुसरीकडे रवींद्र जडेजा न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता आणि अजून तंदुरुस्त झालेला नाही. न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये खेलल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जडेजाच्या हाताला दुखापत झाली होती.
बीसीसीआयने ८ डिसेंबरला दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या एकदिवसीय संघाची घोषणा केली होती. त्यावेळी बीसीसीआयने रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय संघाचा नवीन कर्णधार म्हणून घोषित केले होते. विराट कोहलीला या पदावरून हटवून ही जबाबदारी रोहितवर सोपवली गेली होती. अशात रोहित लवकर तंदुरुस्त होऊन दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधाराची जबाबदारी पार पाडेल अशी चाहत्यांना आशा आहे. तत्पूर्वी भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने आगामी कसोटी मालिकते रोहित आणि जडेजाची कमतरता जाणवेल, असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –
विजय हजारे ट्रॉफीचा थरार अंतिम चरणात, १९ डिसेंबरपासून रंगणार बाद फेरी सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक
फलंदाजीसह यष्टीरक्षण अन् नेतृत्त्वाचा अनुभव, मेगा लिलावात कार्तिकवर असेल ‘या’ ३ आयपीएल संघांची नजर
दक्षिण आफ्रिका संघाला हादरा! प्रमुख खेळाडू पडला अखेरच्या दोन कसोटीतून बाहेर






