---Advertisement---

विजय हजारे ट्रॉफीचा थरार अंतिम चरणात, १९ डिसेंबरपासून रंगणार बाद फेरी सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

On: शुक्रवार, डिसेंबर 17, 2021 5:15 PM
Tripura-Team
---Advertisement---

बीसीसीआय दरवर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन करते. यावर्षी खेळली जात असलेली विजय हजारे ट्रॉफी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेतील साखळी फेरी सामने संपले आहेत आणि आता बाद फेरी सामन्यांना सुरुवात होणार आहे.

साखळी फेरी सामने संपल्यानंतर आता स्पर्धेतील ११ संघ पुढच्या फेरीसाठी तयार आहेत. यापैकी ६ संघांना उप-उपांत्यपूर्वी सामना खेळावा लागणार आहे, तर पाच संघांनी उपांत्यपूर्व सामन्यात स्थान पक्के केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता नॉकआउट सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

स्पर्धेतील पुढच्या टप्प्यात तीन उप-उपांत्यपूर्व, चार उपांत्यापूर्व, दोन उपांत्य आणि एक अंतिम सामना खेळला जाणार आहे. स्पर्धेतील तीन उप-उपांत्यपूर्व सामने १९ डिसेंबरपासून जयपूरमध्ये वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. तसेच मंगळवारी (२१ डिसेंबर) आणि बुधवारी (२२ डिसेंबर) प्रत्येकी दोन उपांत्यपूर्वी सामने जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियम आणि केएल सैनी ग्राउंडवर खेळले जातील.

स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांचे आयोजन शुक्रवारी (२४ डिसेंबर) जयपूरमध्येच केले गेले आहे. उपांत्य सामन्यातील एक सामना सकाळी ९ वाजेपासून सवाई मानसिंह स्टेडियम आणि दुसरा सामना सकाळी ९ वाजेपासून केएल सैनी ग्राउंडवर खेळला जाईल. त्यानंतर अंतिम सामन्याचे आयोजन २६ डिसेंबरला (रविवार) जयपूरमध्येच सवाई मानसिंह स्टेडियमवर केले गेले आहे.

१९ डिसेंबर २०२१, रविवार
उप-उपांत्यपूर्व सामना १ – विदर्भ विरुद्ध त्रिपुरा (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)
उप-उपांत्यपूर्व सामना २ – कर्नाटक विरुद्ध राजस्थान (केएल सैनी ग्राउंड, जयपूर)
उप-उपांत्यपूर्व सामना ३ -उत्तर प्रदेश विरुद्ध मध्य प्रदेश (जयपूरिया विद्यालक ग्राउंड, जयपूर)

२१ डिसेंबर २०२२, मंगळवार
उपांत्यपूर्व सामना १ -हिमाचल प्रदेश विरुद्ध टीबीसी (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)
उपांत्यपूर्व सामना २ – तमिळनाडू विरुद्ध टीबीसी (केएल सैनी ग्राउंड, जयपूर)

२२ डिसेंबर २०२१, बुधवार 
उपांत्यपूर्व सामना ३ – सौराष्ट्र विरुद्द टीबीसी (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)
उपांत्यपूर्व सामना ४ – केरळ विरुद्ध सर्विसेज (केएल सैनी ग्राउंड, जयपूर)

२४ डिसेंबर २०२१, शुक्रवार 
उपांत्य सामना १ – (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)
उपांत्य सामना २ – (केएल सैनी ग्राउंड, जयपूर)

२६ डिसेंबर २०२२, रविवार
अंतिम सामना – (सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर)

महत्वाच्या बातम्या –

फलंदाजीसह यष्टीरक्षण अन् नेतृत्त्वाचा अनुभव, मेगा लिलावात कार्तिकवर असेल ‘या’ ३ आयपीएल संघांची नजर

दक्षिण आफ्रिका संघाला हादरा! प्रमुख खेळाडू पडला अखेरच्या दोन कसोटीतून बाहेर

तब्बल २०८ धावांचा पाठलाग करत पाकिस्तानने रचला इतिहास; पहिल्यांदाच केलाय असा कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---