येत्या काही दिवसात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी आणि ३ वनडे सामान्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सुरू होईल. तसेच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पोहोचला असून लवकरच सराव करायला सुरुवात करेल. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याने पितृत्व रजा घेतली आहे. लवकरच तो बाबा होणार आहे. तो पहिला कसोटी सामना झाल्यानंतर थेट वनडे मालिकेत पुनरागमन करेल. भारतीय संघाविरुद्ध खेळताना दक्षिण आफ्रिका संघाला क्विंटन डी कॉकची कमतरता जाणवू शकते.
क्विंटन डी कॉकच्या अनुपस्थितीत काइल व्हेरेनला संघात स्थान देण्यात आले आहे. तर रायन रिक्लेटनचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी क्विंटन डी कॉक शेवटच्या कसोटीतून बाहेर होणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु आता बातमी येत आहे की, तो शेवटच्या २ कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे.
काइल व्हेरेनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावर टेंबा बावुमाच्या जागी संधी देण्यात आली होती. त्याने ३ डावात ३९ धावा केल्या होत्या. तर रायन रिक्लेटनला अजुनपर्यंत पदार्पण करण्याची संधी मिळाली नाहीये. तो सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो १० व्या स्थानी आहे. तसेच शेवटच्या ३ सामन्यात त्याने २ शतक झळकावले आहेत.
https://www.instagram.com/p/CXi5Z7INs9T/?utm_medium=copy_link
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ : डीन एल्गर (कर्णधार), टेंबा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), कागिसो रबाडा, सारेल एरवी, ब्यूरन हेन्ड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एडन मार्कराम, विआन मुल्डर, ॲनरिक नॉर्टजे, कीगन पीटरसन, रासी वान दर डूसेन, काइल वेरेन, मार्को जॅन्सन, ग्लेंटन स्टुअरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिकेल्टन, डुआन ऑलिव्हियर
असा आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
स्टँडबाय- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चहर, अर्झान नागवासवल्ला
महत्वाच्या बातम्या :
आता विराटवर होणार ‘दादागिरी’! स्वतः बीसीसीआय अध्यक्षांनी दिले संकेत
विराट खोटे बोलतोय का? बीसीसीआय म्हणतेय, “त्या निर्णयाचे आठ साक्षीदार”
लखनऊ संघाच्या प्रशिक्षकपदाची रेस अखेरीकडे? ‘हा’ दिग्गज आघाडीवर






