आयपीएल २०२२ (IPL 2022) सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने दोन नवीन फ्रेंचायझी स्पर्धेत सामील होणार असल्याचे जाहीर केले होते. या दोन नवीन संघांच्या पार्श्वभूमीवर पुढचा आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. पुढच्या हंगामापूर्वी सर्व फ्रेंचायझींनी संघातील चार खेळाडूंना सोडून बाकिच्या सगळ्या खेळाडूंना रिलीज केले आहे. कोलकाता नाइट रायडर्सने दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh karthik) याला पुढच्या हंगामासाठी संघात कायम ठेवले नाही आणि मेगा लिलावासाठी तो उपलब्ध असणार आहे.
दिनेश कार्तिक आयपीएलच्या पहिल्या हंगामासापून या स्पर्धेत खेळत आहे. आयपीएलमध्ये त्याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे आणि यापूर्वी त्याने कोलकाता नाइट रायडर्स संघाचे कर्णधारपद देखील सांभाळले होते. आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांसोबत त्याने आतापर्यंत २१३ सामने खेळले आहेत आणि १२९.७२ च्या सरासरीने ४०४६ धावा केल्या आहेत.
मागच्या काही वर्षांत त्याने एका चांगल्या फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. अशात पुढच्या हंगामापूर्वी अशा काही फ्रेंचायझी आहेत, ज्या कार्तिकला पुढच्या आयपीएल हंगामात स्वतःच्या संघात सामील करू इच्छित असतील. आपण या लेखात अशाच तीन फ्रेंचायझींवर नजर टाकणार आहोत, ज्या मेगा लिलावात कार्तिकवर बोली लावून त्याला संघात सामील करू शकतात.
तीन फ्रेंचायझी, ज्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात कार्तिकवर बोलू लावून त्याला संघात सामील करू शकतात –
१. सनरायझर्स हैदराबाद –
आयपीएलमध्ये सनराजझर्स हैदराबाद संघाकडून आतापर्यंत काही दिग्गज खेळाडू खेळले आहेत, पण त्यांच्याकडे एका चांगल्या यष्टीरक्षक फलंदाजाची कमतरता असल्याचे दिसले आहे. हैदराबाद संघाने यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहावर विश्वास दाखावला होता, पण तो फलंदाजीमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. अशात पुढच्या हंगामासाठी फ्रेंचायझी दिनेश कार्तिकला संघात सामील करण्याच्या प्रयत्नात असेल. सनरायझर्स हैदराबादने जर कार्तिकला पुढच्या हंगामात संघात सामील केले, तर त्यांना एक अनुभवी खेळाडू मिळेल, जो गरजेच्या वेळी संघाचा डाव सांभाळू शकेल आणि वेगाने धावाही करू शकेल.
२. लखनऊ / अहमदाबाद –
आयपीएल २०२२ मध्ये ८ ऐवजी १० संघ खेळणार आहेत. जे दोन संघ नव्याने सामील होणार आहेत, त्यामध्ये एक लखनऊ आणि दुसरा अहमदाबाद आहे. हे दोन्ही फ्रेंचायझी मेगा लिलावात एक चांगला संघ तयार करण्याच्या प्रयत्नात असतील, ज्यामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचे योग्य मिश्रण असेल. अशात दोन्ही संघ अनुभवी दिनेश कार्तिकवर बोली लावून त्याला संघात सामील करण्याच्या प्रयत्नात असू शकतात. कार्तिक यष्टीरक्षणासोबतच संघाच्या मधल्या फळीला अधिक भक्कम बनवू शकतो.
३. राजस्थान रॉयल्स –
आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्समध्ये पहिल्यापासूनच अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश राहिला आहे. पुढच्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला रिटेन केले आहे. सॅमसन सध्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार देखील आहे. त्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर याला देखील संघाने रिटेन केले आहे. असे असले तरी, आयपीएलच्या मागच्या हंगामात संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता जाणवली होती. मागच्या हंगामात राजस्थान रॉयल्सने अनुभवी खेळाडूंनी कमी समावेश केला होता आणि त्याचा नक्कीच त्यांना फटका बसला. अशात अनुभवी दिनेश कार्तिकला संघात सामील करण्यासाठी राजस्थान रायल्स प्रयत्न करू शकतो. कार्तिक फलंदाजीसोबत गरज पडली तर संघाचे नेतृत्व देखील करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिका संघाला हादरा! प्रमुख खेळाडू पडला अखेरच्या दोन कसोटीतून बाहेर
तब्बल २०८ धावांचा पाठलाग करत पाकिस्तानने रचला इतिहास; पहिल्यांदाच केलाय असा कारनामा
पठ्ठ्याने चक्क पंचांनाच दिली जीवे मारण्याची धमकी; आता भोगतोय परिणाम