मोहाली। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात शुक्रवारपासून (४ मार्च) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला (Test Series) सुरूवात झाली. या मालिकेतील पहिला सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना (Virat Kohli 100 Test) असलेला हा सामना संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्यासाठी देखील संस्मरणीय ठरला आहे.
दिग्गजांच्या पंक्तीत सामील अश्विन
मोहाली कसोटीत अश्विन याला दुखापतीमुळे संधी मिळणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्याने त्याला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. याचबरोबर अश्विन मायदेशात आपला ५० वा कसोटी सामना खेळत आहे. यापूर्वी, १० भारतीय खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती.
भारतासाठी घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सर्वकालिन महान फलंदाज सचिन तेंडूलकर याच्या नावे आहे. सचिनने आपल्या २०० कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीतील ९४ सामने भारतात खेळले होते. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या राहुल द्रविडने ७० सामने मायदेशात खेळलेले. तर तिसऱ्या स्थानी दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर व माजी कर्णधार कपिल देव आहेत. त्यांनी प्रत्येकी ६५ कसोटी सामने भारतात खेळले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर, इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहे. अँडरसन याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत ९५ कसोटी मायदेशात खेळलेल्या आहेत.
मायदेशात सर्वाधिक कसोटी खेळणारे भारतीय-
सचिन तेंडुलकर- ९४
राहुल द्रविड- ७०
सुनील गावसकर- ६५
कपिल देव- ६५
अनिल कुंबळे- ६३
व्हीव्हीएस लक्ष्मण- ५७
हरभजन सिंग- ५५
दिलीप वेंगसरकर- ५२
सौरव गांगुली- ५०
रविचंद्रन अश्विन- ५०*
महत्वाच्या बातम्या-
रोहित वयाच्या ३४ व्या वर्षी बनला कसोटी कर्णधार, या विक्रमात कुंबळेनंतर दुसरा क्रमांक (mahasports.in)