---Advertisement---

बड्या लोकांचे, बडे छंद! विमान प्रवासातही अश्विनचा रंगला बुद्धिबळचा खेळ, Video बघा

On: सोमवार, मे 23, 2022 10:05 PM
R-Ashwin-Chess
---Advertisement---

आयपीएल २०२२ चा पहिला क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी (२४ मे) खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ तयारीत आहेत. राजस्थानचा संघ मुंबईवरून कोलकात्यासाठी विमानाने रवाना झाला. यादरम्यान राजस्थान संघाच्या ट्वीटर खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला गेला, जो चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रविचंद्रन अश्विन विमानात बुद्धिबळ खेळताना दिसत आहे.

मुंबईवरून कोलकातासाठी रवाना झालेला राजस्थान रॉयल्स संघ विमानात काय करत होता?, हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. राजस्थान फ्रँचायझीच्या अधिकृत ट्वीटरवरून शेअर केलेल्या व्हिडिओत रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) मोकळ्या वेळेत बुद्धिबळ खेळताना दिसत आहे. बुद्धिबळ खेळताना अश्विनपुढे संघातील एका सहकाऱ्याने आव्हान आहे. अश्विन विरोधकाला मात देण्याच्या पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे आणि त्याचे लक्ष्य दुसरीकडे जराही जात नाहीये.

राजस्थान रॉयल्सने या व्हिडिओला एक मजेशीर कॅप्शन देखील दिले आहे. स्माईलीच्या इमोजिसह फ्रँचायझीने लिहिले आहे की, “आर अश्विनसाठी कोणताही ऑफ डे नाहीये.” हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राजस्थान संघाचा फिरकी गोलदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) कमेंटच्या माध्यमातून व्यक्त झाला. चहलने कमेंटमध्ये लिहिले की, “मी सहभागी होऊ शकतो का?” चहलच्या या प्रश्नावर अश्विनने मजेशीर अंदाजात “नाही” असे उत्तर दिले. फ्रँचायझीने शेअर केलेला हा व्हिडिओ आणि संघातील खेळाडूंच्या कमेंट्स सध्या चर्चेत आहेत.

https://twitter.com/rajasthanroyals/status/1528431387589906432?s=20&t=LDKHk_YdO5vtY_hzlA2XDw

दरम्यान, अश्विनने आयपीएल २०२२ मध्ये केलेल्या कामगिरीवर नजर टाकली, तर त्याने गोलंदाजीसह फलंदाजीत देखील महत्वाचे योगदान दिले आहे. आयपीएलच्या या हंगामात त्याने १४ सामन्यांमध्ये १४६.३० च्या स्ट्राईक रेटने १८३ धावा केल्या. या धावा त्याने ३०.५० च्या सरासरीने केल्या आहेत. गोलंदाजीचा विचार केला तर, चालू हंगामातील १४ सामन्यात त्याने ७.१४ च्या इकोनॉमी रेटने एकूण ११ विकेट्स घेतल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

अगग! एका क्रिकेटरनेच लावला रिषभ पंतला कोटींचा चुना, वाचा संपूर्ण प्रकरण

सुरेश रैना म्हणतोय आरसीबीने जिंकावे आयपीएल; कारण ऐकून व्हाल चकीत

Video: थोडक्यात बचावला राजस्थान संघ! कोलकाताला जाताना विमान प्रवासादरम्यान टळले मोठे संकट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---