नुकत्याच संपलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली होती. साखळी फेरीत अव्वल स्थानी राहिल्यानंतर भारतीय संघाला अंतिम फेरीत मात्र पराभव पत्करावा लागला होता. भारताच्या सर्वच खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार खेळ दाखवला. या विश्वचषकासाठी भारतीय संघात असलेल्या श्रेयस अय्यरने मधल्या फळीत खेळत 500 पेक्षा जास्त धावा केल्या. त्यानंतर आता संघाचा अनुभवी खेळाडू रविचंद्रन अश्विन याने देखील त्याचे कौतुक केले आहे.
वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात श्रेयस याला संधी देण्यात आल्यानंतर अनेकांनी टीका केली होती. मात्र, विश्वचषकात त्याने दमदार कामगिरी करत सर्वांची तोंडे बंद केली. त्याच्या या खेळाने प्रभावित झालेल्या अश्विन याने त्याचे कौतुक केले. तो म्हणाला,
“श्रेयस अय्यर हा उत्कृष्ट परफॉर्मर आहे. खेळात सर्वोत्तम गोष्टीचा पाठलाग करणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. श्रेयस तेच करतो. त्याने पुल शॉटमध्ये प्रभुत्व मिळविण्यासाठी मार्गदर्शन घेतले आणि त्यावर काम केले. त्यावर तो बादही झाला. मात्र, अनेक चेंडू त्याने सीमारेषेपर्यंत पाठवले. हे निश्चितच भारतासाठी चॅम्पियन फलंदाज तयार होत असल्याचे चिन्ह आहे.”
श्रेयस या विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. पहिल्या सामन्यात खातेही न खोलता तो बाद झालेला. त्याने अकरा सामन्यांमध्ये 66.25 च्या सरासरी 530 धावा केल्या. यामध्ये दोन शतके व तीन अर्धशतकांचा समावेश होता.
(Ravichandran Ashwin Praised Shreyas Iyer On His World Cup Performance)
महत्वाच्या बातम्या –
WPL 2024: लिलावाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
रोहितचा Future Plan आला समोर, विराटबद्दलही मिळाली माहिती; वाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याशी संबंधित अपडेट