भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज जवळपास 6 महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. पण नुकत्याच जाहीर केलेल्या वनडे विश्वचषक संघात राहुलचे नाव असल्यामुळे चर्चा जोरात सुरू आहेत. मागच्या काही महिन्यांपासून राहुल आपली फिटनेस सिद्ध करू शकला नाहीये. सोबतच त्याच्या फॉर्मबाबत देखील स्पष्टता नाहीये. अशात त्याची निवड वादाचे कारण ठरत आहे. भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने राहुलच्या संघातील निवडीविषयी मोठा प्रश्न विचारला आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) नेहमीच व्यक्त होत असतो. यावर्षीचा वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. अश्विनचे नाव या विश्वचषक संघात असेल, असेही बोलले जात होते. मात्र, मंगळवारी (5 सप्टेंबर) घोषित झालेल्या वनडे संघात अश्विन नव्हता. याबाबत देखील चर्चा सुरू आहेत. अशातच अश्विनने ईशान किशन आणि केएल राहुल यांच्या निवडीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. या संघात राहुल आणि ईशान किशनला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून शंघात घेतले गेले आहे. संजू सॅमसन (Sanju Samson) पुन्हा एकदा भाहेरचा रस्ता दाखवला गेला.
विश्वचषक संघाविषयी राहुल आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “केएल राहुल याला एक महत्वाचा खेळाडू म्हणून संघात घेतल्यानंतर त्याला संधीही मिळाली पाहिजे. संघ त्याला ही संधी कशी देणार, हा ‘मिलियन डॉलर’चा प्रश्न आहे. जर तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असला, तर लोकांनी असे म्हटले नाही पाहिजे की, याठिकाणी खूप काट-छाट सुरू आहे.” अश्विनने पुढे असेही सांगितले की, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यात स्पर्धा राहिली नाहीये. ईशानने मागच्या काही सामन्यांमध्ये स्वतःला सिद्ध केले, असे अश्विनला वाटते. (Ravichandran Ashwin questions KL Rahul’s selection in the squad for the World Cup)
वनडे विश्वचषक 2023 साठी भारताचा 15 सदस्यीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल.
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2023 । हॅरिस रौफचा नवा विक्रम! सुपर फोर फेरीत बनला ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा खेळाडू
कर्णधार रोहितचा आशिया चषकमध्ये खास रेकॉर्ड, चाहत्यांना जेतेपद पटकवण्याची अपेक्षा