आशिया चषक 2023ची सुपर फोर फेरी बुधवारी (6 सप्टेंबर) सुरू झाली. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून बांगलादेश आणि पाकिस्तान संघ आमने सामने आले आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याने या सामन्यात मोठा विक्रम नावावर केला. रौफने मोहम्मद नईम याची विकेट घेत वनडे क्रिकेटमधील आपल्या 50 विकेट्स पूर्ण केल्या. पाकिस्तानसाठी सर्वात जलत 50 वनडे विकेट्स घेणाऱ्यांमध्ये रौफ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद नईम या सामन्यात 25 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. बांगलादेशच्या डावातील आढव्या षटकात नईमने आपली विकेट गमावली. यावेळी गोलंदाजी हॅरिस रौफ करत होता आणि झेल देखील त्यानेच घेतला. रौफला या सामन्यात मिळालेली ही पहिली विकेट ठरली. वनडे क्रिकेटमधील रौफचा हा 27 वा सामना असून यामध्ये आपल्या 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी पाकिस्तानचा माजी दिग्गज वकार युनिस यानेही 27 वनडे सामन्यात 50 विकेट्सचा टप्पा पार केला होता. माजी दिग्गज सल्लेन मुश्ताक () याचा विक्रम मात्र रौफकडून मोडीत निघाला. सक्लेन मुश्ताक याने 28 वनडे सामन्यात 50 विकेट्स घेतल्या होत्या.
पाकिस्तानसाठी सर्वात कमी सामन्यांमध्ये 50 वनडे विकेट्सचा विक्रम हसन अळी याच्या नावावर आहे. त्याने अवघ्या 24 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. यादीत दुसरा क्रमांक शाहीन शाह अफ्रिदी आहे, ज्याने 25 वनडे सामन्यांमध्ये 50 विकेट्स घेतल्या. (Harris Rauf has become the third fastest Pakistani bowler to take 50 ODI wickets)
पाकिस्तानसाठी सर्वात कमी सामन्यांमध्ये 50 वनडे विकेट्स गेणारे गोलंदाज –
24 – हसन अली
25 – शाहीन शाह अफ्रिदी
27 – वकार युनिस
27 – हॅरिस रौफ
28 – सकलेन मुश्ताक
पाकिस्तान विरुद्ध बांगलादे सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन –
पाकिस्तान – फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ.
बांगलादेश – मोहम्मद नईम, मेहिदी हसन मिराझ, लिटन दास, तौहिद हृदोय, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), शमीम हुसेन, अफिफ हुसैन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.
महत्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तानला माहीतच नव्हतं रन रेटचं समीकरण? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
रोहित बनला वर्ल्डकप खेळणारा भारताचा 8वा कर्णधार, ‘ही’ आहेत इतर 7 नावे