भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने जेव्हापासून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हापासून तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. निवृत्ती घेतल्यापासून तो सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतो आणि सार्वजनिक कार्यक्रमातही सहभागी होत असतो. नुकतेच त्याला एका खाजगी महाविद्यालयाने पदवीदान समारंभात आमंत्रित केले होते. यावेळी त्याला स्टेजवर बोलवण्यात आले. तेव्हा अश्विनने एक असे वक्तव्य केले, ज्यामुळे तो वादात सापडला आहे.
झालं असं की, अश्विनने ज्यावेळी भाषण करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने प्रथम विचारले की किती जण इंग्रजी ऐकतात? याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण जेव्हा त्याने विचारले, तमिळमध्ये किती लोकांना ऐकायचे आहे? तेव्हा सगळ्यांचा एका सूरात चांगला प्रतिसाद मिळाला. पुढे त्याने हिंदीत कोणाला ऐकायला आवडेल? असा प्रश्न विचारल्यावर जास्त प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अश्विन म्हणाला की ,”हिंदी फक्त आपली अधिकृत भाषा असून ती राष्ट्रीय भाषा नाही.” त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर एकतर्फी टीका सुरू झाली.
अश्विनने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मिडियावर चाहते दोन गटांत विभागले गेले आहेत. एकीकडे तमिळ भाषिक चाहते त्याचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे हिंदी भाषिक चाहते त्याच्यावर टीका करत आहेत. देशात हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे या भाषेविषयी असे वक्तव्य करु नये, असा सल्ला हिंदी भाषिक चाहत्यांनी दिला. अश्विनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत जे काही मिळवले, त्यात हिंदी भाषेचा मोलाचा वाटा आहे याची देखील चाहत्यांनी त्याला आठवण करुन दिली.
आर अश्विनने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला होता. त्याच्या अशा अचानक निवृत्तीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
हेही वाचा –
“विराट कोहलीने युवराज सिंगचं करिअर संपवलं!”, माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक आरोप
Champions Trophy 2025; दुबईमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड कसा? पाहा एका क्लिकवर
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सूर्यकुमार यादवला संधी का मिळावी? जाणून घ्या मोठी कारणे