रविचंद्रन अश्विनने 2024 च्या शेवटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅट्समधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्या वेळी सर्वांना अपेक्षा होती की तो आयपीएलमध्ये अजून काही वर्ष खेळताना दिसेल. मात्र 2025 चा आयपीएल हंगाम अश्विनसाठी अपेक्षेप्रमाणे ठरला नाही. यानंतर त्याला चेन्नई सुपर किंग्सकडून रिलीज करण्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण या सर्व चर्चांना पूर्णविराम देत अश्विनने आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली.
यानंतर लगेचच अश्विन विदेशी टी20 लीगमध्ये खेळणार अशी चर्चा सुरु झाली. त्यात आता ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगचे नावही जोडले गेले आहे.
🚨 ASHWIN IN BIG BASH. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 2, 2025
– Ravi Ashwin could potentially be part of the upcoming Big Bash League edition. (Cricbuzz). pic.twitter.com/TOOMR5zMSS
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग यांनी क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “रविचंद्रन अश्विनसारखा अनुभवी खेळाडू बिग बॅश लीगमध्ये आल्यास ते आमच्यासाठी खूप खास ठरेल. त्याने निवृत्तीनंतर विदेशी लीगमध्ये खेळण्याचे संकेत दिले होते. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे. त्याच्या सहभागामुळे बीबीएलचा रोमांच आणखी वाढेल.”
जर अश्विन बीबीएलमध्ये उतरला तर तो या लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ विविध क्लब्स आणि हितधारकांशी चर्चा करत आहेत.
वॉर्नरसारखी मिळू शकते प्रत्येक सामन्याची फी
सध्या डेविड वॉर्नरला बीबीएलमध्ये प्रत्येक सामन्यासाठी जवळपास 80,000 ऑस्ट्रेलियन डॉलर मिळतात. अश्विनला खेळवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया हाच फॉर्म्युला वापरू शकते. त्यामुळे त्यालाही प्रत्येक सामन्यासाठी चांगली रक्कम मिळू शकते.
रविचंद्रन अश्विनकडे टी20 क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये तब्बल 17 हंगाम खेळले असून 221 सामन्यांत 187 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.






