भारतीय संघ (19 सप्टेंबर) घरच्या मैदानानर बांगलादेशसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यातील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. त्यामध्ये भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची (Ravichandran Ashwin) देखील निवड झाली आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी अश्विनने त्याच्या निवृत्तीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
रविचंद्रन अश्विनच्या म्हणन्यानुसार तो भारतीय संघाचा माजी उत्कृष्ट फिरकीपटू अनिल कुंबळेचे (Anil Kumble) कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्सचे रेकाॅर्ड मोडीत काढून निवृत्तीची घोषणा करण्यास उत्सुक आहे. भारतासाठी रविचंद्रन अश्विनची (Ravichandran Ashwin) आतापर्यंतची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत एकूण 100 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने 3,309 धावा आणि 516 विकेट्सही घेतल्या आहेत.
अश्विनने भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये 156 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 72 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन सध्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. पहिल्या क्रमांकावर अनिल कुंबळे (Anil Kumble) आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 619 विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विनच्या मते, अनिल कुंबळेची (Anil Kumble) इच्छा आहे की मी त्यांचा कसोटी विकेट्सचा रेकाॅर्ड मोडावा आणि नंतर निवृत्ती घ्यावी. त्यावर अश्विन म्हणाला, “सध्या माझ्या मनात तसे काही नाही. मी फार दूरचा विचार करत नाही. फक्त त्या दिवसाचा विचार करतो. गेल्या काही वर्षांत मी खूप मेहनत केली आहे आणि ज्या दिवशी मला सुधारणा होत नाही असे वाटेल, तेव्हा मी माझी निवृत्ती जाहीर करेन. माझे कोणतेही वैयक्तिक लक्ष्य नाही पण मी त्याचा रेकाॅर्ड मोडावा अशी अनिल कुंबळेची इच्छा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘हे’ क्रिकेटपटू आहेत दारुचे शौकीन; एकाने तर दारूच्या नशेत शतकही ठोकलंय!
वनडे मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार बटलर बाहेर; केवळ 15 सामने खेळलेल्या खेळाडूकडे नेतृत्व
एकाच कुटुंबातील मुले वेगवेगळ्या देशांसाठी खेळणार, सॅम-टॉम करनचा तिसरा भाऊ ‘या’ देशाकडून खेळणार