---Advertisement---

अश्विन बाद झाल्यानंतर ढसाढसा रडली त्याची मुलगी, आईने सावरण्याचा प्रयत्नही केला पण…, व्हिडिओ व्हायरल

Ravichamdran Ashwins doughter
---Advertisement---

रविवार, 16 एप्रिल रोजी आयपीएलच्या मैदानात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आमना सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सला 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानला विजय मिळवून देण्यासाठी कर्णधार संजू सॅमसन आणि शिमरन हेटमायर यांच्यासह रविचंद्रन अश्विन याचे योगदान महत्वाचे ठरले. असे असले तरी, अश्विन बाद झाल्यानंतर त्याची मुलगी मोठमोठ्याने रडताना दिसली.

राजस्थान रॉयल्स  संघाला या सामन्यात जिंकण्यासाठी 178 धावांचे लक्ष्य मिळाले होते. शेवटच्या षटकांमध्ये शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer) याने 26 चेंडूत नाबाद 56 धावा कुटल्या. तसेच राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने हेटमायरच्या आधीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 32 चेंडूत 60 धावांची ताबडतोड खेळी केली. हेटमायरसोबत वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) शेवटपर्यंत नाबाद राहिला, पण त्याला एकही धाव करता आली नाही.

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) बाद झाल्यामुळे बोल्टला खेळपट्टीवर यावे लागले. अश्विनने डावातील पहिल्या चेंडूवर मोहम्मद शमी याला चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट गमावली. त्याने केलेल्या 10 धावा राजस्थानच्या विजयासाठी महत्वाच्या ठरल्या. अश्विनची खेली पाहण्यासाठी त्याची मुलगी उत्सुक होती. पहिल्या दोन चेंडूंवर त्याने चौकार आणि षटकार मारल्याचे पाहून आता अश्विनच राजस्थानला विजय मिळवून देणार अशी अपेक्षा त्याच्या मुलीची होती. पण शमीने टाकलेल्या 18व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने विकेट गमावली. आपले वडील ऐन मोक्याच्या वेळी बाद झाल्याने अश्विनची मुलगी मोठमोठ्याने रडू लागली. हा व्हिडिओ अश्विनची पत्नी पृथी नारायणन हिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे.

https://twitter.com/thecricketgully/status/1647898043755401217?s=20

दरम्यान, गुजरात आणि राजस्थान यांच्यातील या सामन्यावर एकंदरीत नजर टाकली, तर राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातने 7 बाद 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 7 विकेट्सच्या नुकसानावर 179 धावा केल्या. शिमरन हेटमायरला सामनावीर म्हणून निवडले गेले. गुजरातसाठी सर्वोत्तम प्रदर्शन मोहम्मद शमीचे राहिले, ज्याने 25 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त राशिद खान याने 2 विकेट्स घेतल्या. (Ravichandran Ashwin’s daughter burst into tears after he was dismissed for 10 runs)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

अटीतटीच्या लढतीत रायगड मराठा मार्वेल्स संघाची नंदुरबार हिमालयन ताहर्स संघावर मात
‘तो पण 360 डिग्री खेळाडू…’, वेंकटेशने वादळी शतक ठोकताच इंग्लंडच्या माजी दिग्गजाचे मोठे विधान

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---