न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकल्यानंतर यूएई संघाने इतिहास रचला. शनिवारी (19 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय यूएईने 7 विकेट्सने राखून न्यूझीलंडला पराभूत केले. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या एखाद्या संघाविरुद्ध यूएईने मिळवलेला हा पहिला विजय असल्यामुळे या सामन्याला अधिकच महत्व प्राप्त झाले. असोसिएट संघाच्या या विजयानंतर भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने खास प्रतिक्रिया दिली.
न्यूझीलंड संघ तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी यूएई दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या संघाला विजय मिळाला होता. पण दुसऱ्या सामन्यात यजमानांनी दिमाखात विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने या सामन्यात 8 बाद 142 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यूएईने 3 विकेट्सच्या नुकसानावर 144 धावा केल्या आणि विजय मिळवला. अवघ्या 15.4 षटकांमध्ये यूईने विजय मिळवला. रविचंद्रन अश्विन () याच्या मते फ्रँचायझी क्रिकेट खेळल्याचा फायदा असोसिएट देशांना होत आहे. यावेळी त्याने अफगाणिस्तान संघाचे उदाहरण देखील दिले.
“न्यूझीलंडला पराभूत करणे यूएई संघासाठी मोठी कामगिरी आहे. यातून फ्रँचायझी क्रिकेट काय करू शकते, हे दिसून येते. ही कामगिरी कसोटी क्रिकेट न खेळणाऱ्या देशांच्या पुढच्या पीढीसाठी आशेचा कारन आहे. ही क्रिकेट खेळाच्या दृष्टीने एक चांगली बातमी आहे.”
अश्विनने पुढे राशिद खान याने आयपीएलमध्ये खेळल्यानंतर अफगाणिस्तान संघासाठी केलेल्या कामगिरीचा उल्लेख केला. त्याने लिहिले की, “जेव्हा राशिद आयपीएल खेळायला आला होता, तेव्हा अफगाणिस्तान क्रिकेट जागतिक पातळीवर भीती वाटण्यासारखा संघ नव्हता. पण आता हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. भविष्यात इतर देशांचे क्रिकेटपटू आयपीएल खेळताना आणि आपल्या राष्ट्रीय संघाचे नशीब बदलताना दिसू शकतात. शाबास यूएई.” (Ravichandran Ashwin’s exclusive reaction to UAE’s historic victory, explains the reason behind the success achieved by the Associate team)
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल 2024 पासून गंभीर राहणार अलिप्त? ‘या’ कारणाने घ्यावा लागणार निर्णय
रॉयल लंडन कपमधून बाहेर पडल्यानंतर पृथ्वी शॉने दिला इतरांना दोष! इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत