इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामासाठी लवकरच खेळाडूंचा लिलाव आयोजित केला जाणार आहे. 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये हा लिलाव होणार असल्याचे समजते. तत्पूर्वी सर्व आयपीएल संघांना रविवारी (26 नोव्हेंबर) आपण रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करायची आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघासोबत पुन्हा जोडला जाणार अशा चर्चा आहेत. अशातच भारतीय दिग्गज रविचंद्रन अश्विन याची खास प्रतिक्रिया समोर येत आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स संघात सामील झाला. गुजरातसाठी हे आयपीएलचे पहिले वर्ष असून हार्दिकच्या नेतृत्वात त्यांनी विजेतेपद पटकावले. मागच्या हंगामातही हार्दिकने संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेले, जिथे चेन्नई सुपर किंग्जकडून त्यांना पराभव मिळाला. अशात आगामी हंगामात त्याने गुजरातची साथ सोडून पुन्हा मुंबई इंडियन्स संघाचा हात पकडला, तर अनेकांसाठी हा धक्का असेल. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडत असतो. हार्दिक पंड्याबाबत सुरू असणाऱ्या चर्चांबाबत त्याने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
अश्विनच्या मते हार्दिक खरोखर मुंबई संघात सहभागी होणार असेल, तर फ्रँचायझीच्या हाती सोने लागले आहे. फिरकीपटू म्हणाला, “जर हे खरे असेल, तर मुंबईच्या हाती सोने लागले आहे. माझ्या वाचण्यात आल्याप्रमाणे, जर हे खरे असेल, तर हा पूर्णपणे पैशांचा व्यावहार आहे. मुंबई इंडियन्सकडे सोडण्यासाठी (लिलावात) एकही खेळाडू नाहीये. मुंबई कधीच आपल्या खेळाडूंना अशाप्रकारे सोडत नाही. माझ्या मते असे काही झाले नसावे. पण तरीही मुंबई इंडियन्समध्ये घडलेला हार्दिक पंड्या पुन्हा संघात आला, तर संघ पाहण्यासारखा असेल.”
View this post on Instagram
अश्विनने यावेळी आयपीएलमध्ये कर्णधार संघ बदलणार, असे केवळी तिसऱ्यांदा होत आहे, असेही अश्विन व्हिडिओ म्हणाला. याआधी स्वतः अश्विन पंजाब किंग्जचा कर्णधार अशताना दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला होता. तसेच राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत असणाऱ्या अजिंक्य रहाणे यानेही आपला संघ सोडून दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळले होते. मात्र, हार्दिक अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार असेल, ज्याने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
अश्विन व्हिडिओत पुढे म्हणाला, “फरक फक्त इतका आहे की, हार्दिक आयपीएल ट्रॉफी जिंकणारा कर्णधार आहे. या निर्णयामुळे गुजरात टायटन्सचे संतूलन पूर्णपणे बिघडेल. पण हार्दिक पंड्या 15 कोटी रुपयांचा खेळाडू असल्यामुळे मुंबई इंडियन्सला आपल्या पर्सचे नियोजन करावे लागेल.”
दरम्यान, मागच्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्स संघाकडे अवघे 5 लाख रुपये शिल्लक राहिले होते. यावर्षीच्या मिनी लिलावासाठी मुंबई फ्रँचायझीला अजून 5 कोटी रुपये खर्च करता येणार आहेत. अशा प्रकारे एकूण 5.05 कोटी रुपये एवढी रक्कम सध्या मुंबई इंडियन्स लिलिवात खर्च करू शकतो. अशात हार्दिकला संघात घेण्यासाठी मुंबई फ्रँचायझीला किमान 9.95 कोटी रुपयांचे खेळाडू रिलीज करावे लागतील. माध्यमांतील वृत्तांनुसार इंग्लंड घातक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला मुंबईकडून रिलीज केले जाऊ शकते. आयपीएल 2022च्या लिलिवात मुंबईने आर्चरला 8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. (Ravichandran Ashwin’s interesting reaction to the news about Hardik Pandya)
महत्वाच्या बातम्या –
अर्रर्र! पावसामुळे रद्द होणार INDvsAUS 2nd T20I सामना? एकाच फोटोने वाढवलं टेन्शन
“सुरुवातीपासूनच वापर करा आणि फेका अशी वृत्ती”, इरफानचे ट्विट चर्चेत